@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ kapus & soyabean producer farmer anudan] : राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे , त्या अनुषंगाने राज्यातील सदर पीक उत्पादक शेतकऱ्यांना कमाल 10 हजार रुपये मर्यादेत अनुदान मिळणार आहे . याकरिता सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते , तर ज्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी हे ॲप्स च्या माध्यमातून सन 2023 मधील सोयाबीन व कापूस पिकाची माहिती भरली होती , अशांना सदर अनुदानाची रक्कम मिळणार आहे .
सदर सूचनांमध्ये कृषी विभागाकडून नमूद करण्यात आली आहे की , जे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनामध्ये नोंदणी केलेली आहे , त्यांना सदर योजनेच्या माध्यमातून ईकेवायसी करण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नसेल , त्यांना थेट लाभ हस्तांतरण करण्यात येणार आहे असे नमूद करण्यात आलेले आहे .
त्याचबरोबर फक्त कृषी विभागाने प्रसिद्ध केलेल्या यादीमधीलच शेतकऱ्यांना ई- केवायसी करावी लागेल, त्याशिवाय त्यांना लाभ हस्तांतरण करता येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहेत .
त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या आधारशी मोबाईल क्रमांक लिंक नाही , त्यांनी ई – सेवा केंद्र वरती जाऊन ई – केवायसी पूर्ण करावी लागणार आहे , त्याशिवाय सदर पीक अनुदानाची रक्कम खात्यामध्ये वर्ग केली जाणार नाही .
त्याचबरोबर सदर योजनेच्या अनुषंगाने बऱ्याच फसवणाऱ्या लिंक पाठवले जाऊ शकतात , ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आधार क्रमांक आणि ओटीपी हा कोणत्याही अनोळखी व्यक्ती सोबत शेअर करू नयेत , याबाबत काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आली आहेत . ज्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते .
- पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
- सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
- दिनांक 05 मे रोजीच्या काही प्रमुख घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर बातम्या !
- राज्यातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ; तब्बल 50 हजार कंत्राटी / रोजंदारी कर्मचारी होणार राज्य शासन सेवेत नियमित – कोर्टाचे निर्देश !