अखेर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा , प्रतिलिटर मागे 07/-  रुपयांच्या अनुदान ; GR निर्गमित दिनांक 26 सप्टेंबर 2024 .

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ cow milk anudan Shasan Nirnay ] : अखेर राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे  , राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर मागे 7/-  रुपयांचे अनुदान देणे संदर्भात राज्याच्या कृषी व पदुम विभाग मार्फत दिनांक 26 सप्टेंबर रोजी दिलासादायक निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

सदर निर्णयानुसार दूध अनुदान योजना अंतर्गत यापूर्वी गाईच्या दुधाकरिता शेतकऱ्यांना प्रति लिटर मागे पाच रुपयांच्या अनुदान दिले जात होते . तर यामध्ये आता दिनांक 01 ऑक्टोबर 2024 पासून 02 /- रुपयांची वाढ केली असून ,  आता गाईंच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना सात रुपयांचे अनुदान दिले जाणार आहेत .सदर शेतकऱ्यांना थेट डीबीटी प्रणाली मार्फत बँक खात्यामध्ये अनुदानाचे पैसे वर्ग केले जाणार आहेत .

दूध भुकटी रूपांतरण योजना अंतर्गत दिनांक 01 जुलै 2024 ते दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत प्रति लिटर 1.50/- रुपये अनुदान देण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे .

सदर दूध अनुदान देताना शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये पैसे वर्ग केले जातील ,  सदर दूध योजना अंतर्गत केवळ राज्यातीलच नागरिकांना अनुदान देय राहणार आहे , तर शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्याशी आपल्याजवळ असलेल्या पशुधनाची भारत पशुधन या पोर्टलवर नोंदणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे .

तर सदर योजनेअंतर्गत राज्यातील सहकारी दूध संघ तसेच खाजगी दूध संघ प्रकल्पांनी आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास यांच्याकडे आवेदन सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहेत . सदरचा निर्णय सध्याच्या दूध दरामध्ये घसरण झाली असल्याने , दिनांक 12 जुलै 2024 रोजी च्या मंत्रिमंडळ बैठकीच्या मान्यतेनुसार निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

दूध अनुदान शासन निर्णय

Leave a Comment