@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Holidays for schools and colleges in the state on December 2nd, 5th and 6th ] : दिनांक 02 डिसेंबर , 05, 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा / महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे .
दिनांक 02 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी : दिनांक 02 डिसेंबर रोजी राज्यात नगरपरिषदा / नगर पंचायतीच्या निवडणूका जाहीर होणार आहेत . त्या निमित्ताने राज्यात दिनांक 02.12.2025 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .
05 डिसेंबर रोजी संपामुळे सुट्टी : दिनांक 05 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ मार्फत टीईटी परीक्षा अनिवार्यतेच्या विरोधात संपाचा इशारा देण्यात आलेला आहे . यामुळे राज्यात दिनांक 05.12.2025 रोजी राज्यातील शाळा बंद असणार आहेत .
दि.06.12.2025 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने दिनांक 06.12.2025 मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यातील शासकीय / निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेले आहे . या संदर्भात दि.19.11.2025 रोजी अधिकृत्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
दिनांक 07 डिसेंबर रोजी रविवार असल्याने दिनांक 07 डिसेंबर रोजी शाळांना सुट्टी मिळणार आहे . यामुळे दिनांक 05 ते 07 अशी सलग 03 दिवस शाळांना सुट्टी मिळणार आहे .
- शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी ; टीईटी परीक्षा दि.31.08.2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार – विधी व न्याय विभागाचा अभिप्राय !
- सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी ( दिवाळी , उन्हाळी , इतर सार्वजनिक ) ; पाहा सविस्तर !
- हिवाळी अधिवेशनांमुळे दि.13 व 14 डिसेंबर 2025 ची सुट्टी रद्द ; कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याचे परिपत्रक .
- कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.04.12.2025
- कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण “राईट टु डिस्कनेक्ट – 2025” विधेयक लोकसभेत सादर ; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा !