@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ soyabean / kapus anudan E-KYC ] : सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे सन 2023 खरीप हंगामातील झालेल्या नुकसानी करिता शेतकऱ्यांना अर्थसाह्य देणे बाबत , राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे . त्या अनुषंगाने पात्र शेतकऱ्यांची यादी कृषी विभाग मार्फत प्रसिद्ध करण्यात आली असून , यामध्ये ज्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे , अशा शेतकऱ्यांनी ही केवायसी पूर्ण करून घेण्याचे निर्देश दिले गेले आहेत .
मोबाईल द्वारे ई केवायसी पूर्ण करण्याकरिता सर्वप्रथम आपण https://scagridbt.mahait.org/ या संकेतस्थळावर जावे , त्यानंतर Disbursement Status या ऑप्शन वरती क्लिक करावे , त्यानंतर त्यामध्ये Enter Aadhar Number या ऑप्शन वरती आपले आधार नंबर टाकून खाली नमूद कॅपच्या टाकावा . त्यानंतर Authentication Type मध्ये OTP या ऑप्शन वरती क्लिक करून आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी त्या ठिकाणी टाकावा .
आपल्या आधार क्रमांकाला मोबाईल नंबर लिंक असेल तरच, ओटीपी मोबाईलवर येईल , तो ओटीपी टाकून त्यानंतर आपली ई-केवायसी पूर्ण होईल . त्यानंतर आपल्याला आपल्या पिकांची माहिती , गट नंबर , नुकसान मदत पिकांचा तपशील यासंदर्भातील माहिती त्या ठिकाणी नमूद होईल , जी की आपण पाहणी ई पीक पाहणी या ॲप्सवर भरली होती .
आधारला मोबाईल नंबर लिंक नसल्यास : अनेक शेतकऱ्यांचे आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नाहीत , यामुळे अशा शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या ई सेवा केंद्राशी संपर्क साधून त्या ठिकाणी बायोमेट्रिक या ऑप्शनचा निवड करून ई – केवायसी पूर्ण करावी लागेल .
सदर ई केवायसी पूर्ण झाल्याच्या नंतरच सदर कापूस व सोयाबीन पिकाच्या अनुदानाची रक्कम खात्यामध्ये वर्ग होईल , आपली ई – केवायसी पूर्ण आहे की नाही , ते देखील सदर ऑप्शन च्या माध्यमातून चेक करता येईल . अथवा या संदर्भात अधिकची माहिती करिता आपल्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा.
- राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
- दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !
- निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने घेणे व जुनी पेन्शन बाबत 02 स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित दि.10.06.2025
- राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 10 जुन रोजी घेण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) !