@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pension crisis will increase in the country; Media report ] : देशावर पेन्शनचे संकट वाढणार असल्साचा दावा मिडीया रिपोर्टने केला आहे . याबाबतचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो , तर पुढील 30 वर्षाच्या नंतर वृद्धांची संख्या वाढणार आहे . यामुळे देशावर पेन्शन संक्ट ओढावणार असल्याचा दावा मिडीया रिपोर्टने केला आहे . याबाबत सरकारच्या OCED च्या पेन्शन कायदा 2025 मध्ये नमुद करण्यात आले आहे .
कारण सध्या देशातील कामगारांमध्ये ज्येष्ठांचे प्रमाण हे 12.2 टक्के तर पुढे सन 2054 पर्यंत हे प्रमाणे 27.1 टक्के पर्यंत पोहोचणार आहे . यामुळे निवृत्तीचे प्रमाण वाढणार आहे , परिणामी पेन्शन धारकांची संख्या वाढणार आहे .निवृत्तीनंतर पेन्शन धारकांचे सरासरी आर्युमान हे 17 वर्षे आहे . यामुळे पेन्शन धारकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे .
निवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना सरासरी 21,000/- रुपये पेन्शन मिळते तर नविन पेन्शन प्रणालीनुसार सदर पेन्शन नुसार किमान 10,000/- रुपये पेन्शन मिळते . तर श्रावण बाळ योजना / वयोवृद्ध नागरिकांना देखिल किमान 1500/- प्रतिमहा पेन्शन दिली जाते .
सन 2054 पर्यंत वयोवृद्धांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने , पेन्शनधारकांची संख्या सर्वाधिक होणार आहे . ही आकडेवारी जरी सत्य असली तरी ही काही संकटाची बाब नाही .
कारण नविन पेन्शन प्रणालीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या दरमहा योगदानावर पेन्शन दिली जाते . यामुळे याचा थेट परिणाम सरकारच्या तिजोरीवर होणार नाही . पेन्शन धारकांमुळे सरकारी तिजोरीवरील आर्थिक संकटाचा मिडीया रिपोर्टने केलेला दावा मध्ये काही तथ्य नाही .
- शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी ; टीईटी परीक्षा दि.31.08.2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार – विधी व न्याय विभागाचा अभिप्राय !
- सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी ( दिवाळी , उन्हाळी , इतर सार्वजनिक ) ; पाहा सविस्तर !
- हिवाळी अधिवेशनांमुळे दि.13 व 14 डिसेंबर 2025 ची सुट्टी रद्द ; कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याचे परिपत्रक .
- कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.04.12.2025
- कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण “राईट टु डिस्कनेक्ट – 2025” विधेयक लोकसभेत सादर ; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा !