@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ latest news ] : आत्ताच्या काही प्रमुख चालु घडामोडी या लेखांमध्ये पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
तपोवन वाद : नाशिक कुंभमेळासाठी तपोवन येथे हजारो झाडे तोडली जात आहे , त्या विरोधात आता सयाजी शिंदे , राज ठाकरे , समाजसेवक रिंगणात उतरले आहेत . याशिवाय आता नागरिकांकडून देखिल सोशल मिडीयावर संपात व्यक्त केला जात आहे .
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लांबणीवर : आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयांमध्ये याचिका सुरु असल्याने , राज्यातील पंचायती समिती , जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत .
सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ : सोन्याच्या किंमतीत दिवाळी नंतर अचानक घसरण झाली होती , परंतु आता पुन्हा एकदा किंमतीत वाढ होताना दिसून येत आहे . आजचे 24 कॅरेट सोन्याची किंमत 131,295/- रुपये इतकी आहे . तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 120559/- रुपये इतके आहे .
रब्बी हंगाम पिक विमा : रब्बी हंगामातील गहु , हरभरा , कांदा यांकरीता पीक विमा भरण्यासाठी दिनांक 15.12.2025 अशी अंतिम मुदत देण्यात आली आहे .
ट्रम्प टॅरिफचा अमेरिकेतील सामान्य व्यापारांवर विपरित परिणाम होत आहे , यामुळे अमेरिकेत ट्रम्पच्या टॅरिफ विरोधात निदर्शने करीत आहेत .
नेपाळ भुभाग वाद ; नेपाळने आपल्या चलनी 100 च्या नोटावर भारतीय भुभाग आपला असल्याचे दाखविल्याने नवा वाद निर्माण झाला आहे .
- शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी ; टीईटी परीक्षा दि.31.08.2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार – विधी व न्याय विभागाचा अभिप्राय !
- सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी ( दिवाळी , उन्हाळी , इतर सार्वजनिक ) ; पाहा सविस्तर !
- हिवाळी अधिवेशनांमुळे दि.13 व 14 डिसेंबर 2025 ची सुट्टी रद्द ; कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याचे परिपत्रक .
- कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ती मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.04.12.2025
- कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण “राईट टु डिस्कनेक्ट – 2025” विधेयक लोकसभेत सादर ; कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा !