लाडकी बहीण योजनाची प्रभावी अंमलबजावणी करीता महिला व बाल विकास विभाग मार्फत दि.19 जुलै रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Ladaki bahin yojana new shasan nirnay ] : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी विविध प्रकारच्या समित्यांचे गठण महीला व बाल विकास मार्फत दिनांक 19 जुलै 2024 रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे .

महिला व बाल विकास विभागाच्या सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि ,  महाराष्ट्र राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्याकरीता व त्यांच्या आरोग्य व पोषणांमध्ये सुधारणा करण्याकरीता व त्यांच्या कुटुंबामधील त्यांची निर्णायक भुमिका अधिक सक्षम करण्यासाठी राज्यांमध्ये विद्यमान सरकारने लाडकी बहीण या योजनांची सुरुवात करण्यात आलेली आहे  .

महिला व बाल विकास विभागाच्या दिनांक 15 जुलै 2024 रोजीच्या संदर्भिय निर्णयातील पुढे नमुद करण्यात आलेल्या समित्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी धारावी पुनर्विकास प्राधिकारण मुंबई यांचा आमंत्रित सदस्य म्हणून समावेश करण्यात येत आहेत .

यांमध्ये लाभार्थी नोंदणी पोर्टल समितीमध्ये अपर मुख्य सचिव उर्जा विभाग , मंत्रालय , मुंबई हे अध्यक्ष , प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य तर सचिव महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य सचिव असणार आहेत .

तर लाभ अदायगी प्रणाली समिती पुढीलप्रमाणे असेल .

पदनामसमितीमधील पदनाम
अपर मुख्य सचिव , वित्त विभाग मंत्रालय मुंबईअध्यक्ष
सचिव लेखा व कोषागारे मंत्रालय मुंबईसदस्य
संचालक लेखा व कोषागारेसदस्य सचिव

अशा प्रकारच्या समितीची स्थापना करण्यास वरील नमुद निर्णयांनुसार मंजूरी देण्यात आलेली आहे .

Leave a Comment