@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Ladaki bahin yojana new shasan nirnay ] : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी विविध प्रकारच्या समित्यांचे गठण महीला व बाल विकास मार्फत दिनांक 19 जुलै 2024 रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे .
महिला व बाल विकास विभागाच्या सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , महाराष्ट्र राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र्याकरीता व त्यांच्या आरोग्य व पोषणांमध्ये सुधारणा करण्याकरीता व त्यांच्या कुटुंबामधील त्यांची निर्णायक भुमिका अधिक सक्षम करण्यासाठी राज्यांमध्ये विद्यमान सरकारने लाडकी बहीण या योजनांची सुरुवात करण्यात आलेली आहे .
महिला व बाल विकास विभागाच्या दिनांक 15 जुलै 2024 रोजीच्या संदर्भिय निर्णयातील पुढे नमुद करण्यात आलेल्या समित्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी तथा विशेष कार्य अधिकारी धारावी पुनर्विकास प्राधिकारण मुंबई यांचा आमंत्रित सदस्य म्हणून समावेश करण्यात येत आहेत .
यांमध्ये लाभार्थी नोंदणी पोर्टल समितीमध्ये अपर मुख्य सचिव उर्जा विभाग , मंत्रालय , मुंबई हे अध्यक्ष , प्रधान सचिव माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य तर सचिव महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य सचिव असणार आहेत .
तर लाभ अदायगी प्रणाली समिती पुढीलप्रमाणे असेल .
पदनाम | समितीमधील पदनाम |
अपर मुख्य सचिव , वित्त विभाग मंत्रालय मुंबई | अध्यक्ष |
सचिव लेखा व कोषागारे मंत्रालय मुंबई | सदस्य |
संचालक लेखा व कोषागारे | सदस्य सचिव |
अशा प्रकारच्या समितीची स्थापना करण्यास वरील नमुद निर्णयांनुसार मंजूरी देण्यात आलेली आहे .

-
समान काम समान वेतन लागु करुन थकबाकी रक्कम देणेबाबत अखेर शासन निर्णय निर्गमित दि.20.03.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government decision finally issued on 20.03.2025 regarding payment of arrears by implementing equal pay for equal work ] : समान काम समान वेतन लागु करुन थकबाकी रक्कम देणेबाबत , अखेर कृषी व पदुम विभाग मार्फत दिनांक 20 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .…
-
आज दिनांक 20 मार्च रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी ; जाणुन घ्या सविस्तर !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Some major current affairs of today, March 20 ] : आज दिनांक 20 मार्च 2025 रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी या लेखांमध्ये सविस्तर पणे जाणून घेवूयात .. बीडमध्ये मनाई आदेश : बीड जिल्ह्यातील सुरु असणाऱ्या अशांतता लक्षात घेवून दिनांक 02 एप्रिल 2025 पर्यंत मनाई आदेश लागु करण्यात आले…
-
सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मिडीया वापर करणेबाबत सरकारकडून कठोर नियमावली – मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून निर्देश !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government imposes strict rules on government employees’ use of social media ] : सोशल मिडीया वापराबाबत , सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कठोर नियमावली लादण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बुधवार रोजी विधान परिषदेत माहिती दिली आहे . राज्यातील सरकारी अधिकारी / कर्मचारी यांनी सोशल मिडीया ( व्हाट्सॲप ,…