@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ These 21 new districts will be created in Maharashtra for increasing population and administrative convenience. ] : महाराष्ट्राची वाढती लोकसंख्या तसेच प्रशासकीय सोईसाठी राज्यांमध्ये नविन जिल्हा निर्मिती होणे आवश्यक आहे . याकरीता वारंवार नागरिक तसेच राजकारणांच्या मागण्यांनुसार 21 नविन जिल्हे निर्मितीच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहेत .
नविन जिल्ह्याची निर्मिती कशासाठी : राज्यातील बऱ्याच ग्रामीण भागांपासुन जिल्ह्याचे ठिकाण बरेच दुर आहेत , यामुळे मोठ्या जिल्ह्याचे टोकावर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना प्रशासकीय कारणांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी 3-4 तास लागुन जातात . तसेच राज्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून , नविन जिल्ह्यांची निर्मिती होणे आवश्यक आहे .
नविन प्रस्तावित जिल्ह्यांची यादी विभाग निहाय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
कोकण / नाशिक / पुणे विभाग महाराष्ट्र | |
विद्यमान जिल्हा | नविन प्रस्तावित जिल्हा |
पुणे | शिवनेरी |
सातारा | माणदेश |
ठाणे | कल्याण , मीरा भाईंदर |
रायगड | महाड |
रत्नागिरी | मानगड |
जळगाव | भुसावळ |
अहिल्यानगर | शिर्डी , श्रीरामपुर , संगमनेर |
नाशिक | कळवण , मालेगाव |
मराठवाडा विभाग : मराठवाडा विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत , तसेच क्षेत्राफळाच्या दृष्टीने मोठा विभाग असल्याने , नविन जिल्हा निर्मिती होणे आवश्यक असल्याचे तज्ञांचे देखिल मत आहे .
विद्यमान जिल्हा | नविन प्रस्तावित जिल्हा |
लातुर | उदगीर |
नांदेड | किनवट |
बीड | आंबेजोगाई |
विदर्भ विभाग ( नागपुर व अमरावती विभाग ) :
विद्यमान जिल्हा | नविन प्रस्तावित जिल्हा |
अमरावती | अचलपुर |
यवतमाळ | पुसद |
भंडारा | साकोली |
चंद्रपुर | चिमुर |
गडचिरोली | अहेरी |
बुलढाणा | खामगाव |
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !