Election ; निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे जरांगे पाटील यांच्याशी सामाजिक युती !

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी : राज्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी पक्षासोबत वंचित बहुजन आघाडी पक्ष युती करणार असल्याची मोठी चर्चा रंगत होती  , परंतु अखेर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय प्रकाश आंबेडकर यांनी युती करण्यास नकार दिला आहे .

माननीय प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत महाविकास आघाडी सरकारच्या वरिष्ठ नेत्यांनी सविस्तर चर्चा केली  , सदर चर्चेमध्ये वंचित बहुजन आघाडी पक्षाला लोकसभेत पाच जागा देण्याची कबुली देखिल केली होती .  परंतु वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना हे गणित मान्य नसल्याने , त्यांनी स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवण्याचे ठरविले आहे .

यादरम्यान प्रकाश आंबेडकर पत्रकारांशी बोलताना सांगितले कि, मनोज जरांगे पाटील यांची देखील बाजू घेऊन पुढे जाणे आवश्यक आहे . जरांगे पाटील यांनी समाजासाठी जीवाची परवा न करता , आंदोलन केले आहे , व यश देखील मिळवून दिले . यामुळे त्यांची विचारसरणी देखील विसरता कामा नये . यामुळे प्रकाश आंबेडकर व मनोज जरांगे पाटील यांची सामाजिक युती सदर लोकसभा निवडणुकीमध्ये असणार आहे .

महाविकास आघाडी युती सोबत लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याने , प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाचे पहिल्या यादीमध्ये आठ उमेदवार जाहीर केली आहे . तर पुढील दोन दिवसांमध्ये उर्वरित उमेदवारांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे .यावेळी त्यांनी नमूद केले की , महाविकास आघाडी मध्ये वंचित आघाडीचा घराणेशाही वाचवण्यासाठी केवळ वापर करण्याचा बेत होता .

वंचित आघाडी पक्षाची स्थापनेनंतर राज्यातील डॉ . बाबासाहेबांचे विचार मानणारे लोक निवडणुकीत वंचित आघाडी पक्षाला मोठ्या प्रमाणात मतदान करतात ,  यामुळे याचा तोटा काँग्रेस पक्षाला राज्यात मागील निवडणुकीमध्ये झालेला आहे . यामुळे वंचित बहुजन आघाडी पक्षाला महाविकास आघाडी सोबत घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता , सदरचा प्रस्ताव पूर्णतः  निष्फळ ठरला आहे .

Leave a Comment