@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजन 2.0 अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना दिवसा अखंडीत तसेच शाश्वत वीज पुरवठा करण्याचे अभियान उद्योग व उर्जा व कामगार विभागाच्या दिनांक 08.05.2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार जाहीर करण्याात आलेले आहेत .
या अभियान अंतर्गत राज्यांमध्ये 7000 मेगावॅट क्षमतेचे सौर उर्जा प्रकल्प निर्माण करण्यात येणार आहेत , तसेच सदर अभियान अतंर्गत आस्थापित होणाऱ्या सौर उर्जा प्रकल्पांसाठी उपकेंद्राच्या आवश्यक देखभाल व सुधारणांसाठी यांमध्ये ब्रंकर्सची दुरुस्ती तसेच बदलणे , संरक्षण प्रणाली दुरुस्ती अथवा बदल , उपकेंद्रातील सर्किट बदल , ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे कॅपॅसिटर बदल इ. करीता प्रति उपकेंद्र करीता 25 लाख पर्यंत अनुदान महावितरण / महापारेषण कंपनीस शासनांकडून उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
सदरच्या शासन निर्णयानुसार , मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अभियान अंतर्गत वीज उपकेंद्राच्या आवश्यक देखभाल तसेच सुधारणा करण्यासाठी 40 कोटी रुपये इतका निधी व अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक , महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या. यांना वितरीत करण्यासाठी सदर शासन निर्णयानुसार राज्य सरकारने मंजूरी दिलेली आहे .
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत घटक करीता करण्यात येणाऱ्या खर्चाचा उद्दीष्ट्ये व प्रत्यक्ष साध्यता याबाबतच्या माहितीसह मासिक व त्रेमासिक अहवाल लगतच्या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत महावितरण कंपनीने शासनास सादर करण्याचे तसेच सदर शासन निर्णयान्वये वीज उपकेंद्राच्या देखभाल व दुरुस्तीसाठी मंजूर करण्यात आलेला निधी केवळ सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी खर्च करण्यात येणार असल्याची खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील उद्योग उर्जा व कामगार विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेला सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

