मराठ्यांच्या अटकेपार सत्तेमुळे , आजही देशातील विविध राज्यांमध्ये आढळतात ,मराठी भाषिक लोकं !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : औरंगजेबच्या मृत्युनंतर दिल्लीची सत्ता कमकुवत झाली होती , यामुळे मराठ्यांनी आपली सत्ता ही उत्तर भारतातच नव्हे तर तेंव्हा भारताची सिमा ओलांडून अटकेपर्यंत आपली सत्ता काबीज केली होती ,इ.स.1758 सालापर्यंत मराठ्यांनी दिल्लीवर संपुर्ण काबीज मिळविले होते . यामुळे उत्तर भारतासह वायव्य व ईशान्ये कडीला राज्यांमध्ये देखिल आपली सत्ता स्थापन करण्यात आलेली होती .

यामुळेचे मराठे हे भारतांमध्ये सर्वत्र ठिकाणी पसरले होते , यांचे वंशज आज देखिल तेथील भागांमध्ये वास्तव्य करतात . मराठ्यांची सत्ता स्थापनेमुळे तत्कालीन मराठे हे इतर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारासाठी पसरले होते . आज जर आपण हरीयाणा व पंजाब भागांमध्ये पाहिले तर मराठे मोठ्या संख्येने वास्तव्य करतात , त्यांना रोड मराठा या नावाने ओळखले जातात . जे कि पानिपतच्या युद्धानंतर तेथेच वास्तव्यास आहेत .

त्यानंतर कोलकाता मध्ये व्यापार करण्यासाठी गेलेले मराठे तेथेच वास्तव्यास आहेत , त्यावेळी मराठ्यांचे हिरे , मोती तसेच धान्यांचे व्यापार मोठ्या प्रमाणात करायचे , कोलकाता हे शहर इतर राष्ट्रांसोबत व्यापार करण्यासाठी अधिक सोयीस्कर होते , यामुळे मराठ्यांनी व्यापाराकरीता तेथे वस्ती बसवली होते . जरी बऱ्याच दिवसांपासून हे मराठे तेथे वास्तव्य करीत असले तरी , ते अद्याप मराठी भाषेतुनच बोलतात , परंतु त्यांच्या भाषेमध्ये बऱ्याच प्रमाणात बंगाली भाषेचा वापर होतो .

याशिवाय दादर नगर हवेली , दीव व दमण हे जरी केंद्र शासित प्रदेश असले , तरी तेथे मोठ्या प्रमाणात मराठी भाषीक लोक वास्तव्य करतात . तसेच गोवा ह्या राज्याची कोकणी ही जरी राज्यभाषा असली , तरी गोवा राज्याचे प्रशासन हे मराठी भाषामधूनचे चालते , कोकणी ही भाषा मराठी भाषेला समरुप भाषा आहे , तेथे 50 टक्के लोकं हे मराठी भाषीक आहेत .

याशिवाय महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील राज्यामध्ये (  गुजरात , मध्य प्रदेश , छत्तीसगढ , तेलंगणा , कर्नाटक ) लगतच्या जिल्ह्यांमध्ये मराठी भाषीक मोठ्या प्रमाणात राहतात ,या उलट आपल्या राज्यातील सीमेवरील जिल्ह्यांमध्ये इतर राज्यातील भाषिक लोकं वास्तव्य करतात .

Leave a Comment