@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी – आजकाल मुलं आई – वडीलांचा उतारवयांमध्ये सांभाळ करीत नाहीत , ज्यावेळी पालकांची संपत्ती मुलांच्या नावावर झाली त्यानंतर मुल आई – वडीलांना एकटे पाडून उतारवयांमध्ये आधार देत नाहीत . ज्येष्ठ नागरिक यांची देखभाल व कल्याण कायदा – 2007 नुसार , आई – वडीलांचे वय हे 60 वर्षे पेक्षा अधिक झाल्यास , मुलं त्यांचा सांभाळ करीत नसल्यास , पालकांनी मुलांच्या नावे करण्यात आलेली संपत्ती पुन्हा परत देण्याचा अधिकार हा पालकांच्या तक्रारी नंतर आहे .
यांमध्ये बक्षीसपत्र , खरेदी खज रद्द करता येवू शकतो , अशी संपत्ती जर पालकांने मुलांच्या नावे कधीही केली असल्यास , ती पालकांच्या तक्रारी नंतर परत करता येते .अशा प्रकारच्या मालमत्ता मध्येच पालकांना प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार करुन परत मिळवता येईल .
बऱ्याच वेळी वडोलापार्जित जमीन ही आई – वडील उतार वयांमध्ये मुलांच्या नावे करुन टाकतात , परंतु उतारवयांमध्ये मुलं त्यांना आधार देण्याऐवजी घराबाहेर काढले जाते , यामुळे उतारवयांमध्ये मुलांनी आपला सांभाळ करीत नसल्यास , प्रांताधिकाऱ्यांकडून तक्रार करुन , आपली वडोलापार्जित मालमत्ता परत मिळवू शकतो .अन्यथा प्रांताधिकाऱ्यांकडून ज्येष्ठ नागरिक देखभाल आणि कल्याण कायदा – 2007 नुसार वयाच्या 60 वर्षाच्या नंतर पालकांचा सांभाळ खर्च देण्याचे सुचना देवू शकतात .
तर ज्यावेळी आई – वडीलांच्या नावे जमिन असेल अशा वेळी मुलं , आई – वडीलांचा सांभाळ चांगल्या प्रकारे करतात .यामुळे आत्ताचे पालक देखिल सतर्क झाले असून , लवकर आपल्या मुलांच्या नावे मालमत्ता करत नसताना दिसून येत आहेत .
- राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
- दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !
- निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने घेणे व जुनी पेन्शन बाबत 02 स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित दि.10.06.2025
- राज्य कर्मचारी संदर्भात दिनांक 10 जुन रोजी घेण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) !