@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : ग्रामीण भागातील लोकांना व्यवसाय / उद्योग करण्याची मोठी इच्छा असते , परंतु पैश्यांच्या अभावी व्यवसाय / उद्योग करु शकत नाहीत . परंतु सरकार मार्फत उद्योग / व्यवसायाला चालना देण्यासाठी कर्जे / अनुदान उपलब्ध करुन दिले जाते . असे कोणत्या योजना आहेत , ज्यांच्या माध्यमातुन एखादे नविन उद्योग / व्यवसाय करण्यासाठी कर्जे उपलब्ध होतात , त्या योजनांचा तपशिलवार माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
बीज भांडवल योजना : बीज भांडवल योजनांच्या माध्यमातुन केंद्र सरकारकडून तब्बल 50 हजार रुपये ते तब्बल 5 हजार रुपये पर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध होते , जी कि बीजभांडवलीसाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकामार्फत प्राप्त होते , ज्याची परतफेड ही 3 ते 5 वर्षांपर्यंत करता येते . ही योजना विशेषत : अनुसुचित जाती / जमाती , विमुक्त जाती / जमाती , मागास वर्गीय उमेदवारांना अनुदानांच्या 20 टक्के कर्ज सुविधा उपलब्ध करुन देण्यात येते .
विश्वकर्मा प्रशिक्षण योजना : या योजनांच्या माध्यमातुन अनुचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी प्रथम प्रशिक्षण देवून प्रशिक्षण अंति व्यवसायासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी 50 हजार रुपये पर्यंत मदत सहाय्य दिले जाते , यांमध्ये प्रामुख्यांने , मोटार वायंडिंग , ब्यूटीपार्लर , संगणक प्रशिक्षण , सुतारकाम , वेल्डर , ऑटोमोबाईल , रिपेअरिंग , पेंटिंग , फोटोग्राफी , चर्मोद्योग , कंपोडिंग , मोबाईल दुरुस्ती अशा प्रकारचे विविध व्यवसाय करीता प्रथम प्रशिक्षण देण्यात येते . यांमध्ये प्रशिणार्थ्यांस प्रशिक्षण काळांमध्ये 500/- रुपये तर जिल्हा बाहेरील प्रशिक्षणार्थ्यांस 600/- रुपये इतका प्रतिमहा विद्या वेतन अदा केले जाते .
मुदत कर्ज सुविधा : या कर्ज सुविधा योजना अंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातुन , व्यवसाय / उद्योग उभारणीकरीता NSFDC मार्फत कर्ज सुविधा उपलब्ध करुन दिले जाते .
सुक्ष्म पतपुरवठा : आपणांस अल्प रक्कमेची कर्ज हवी असल्यास , राष्ट्रीयकृत्त बँकामार्फत 5 टक्के व्याजदरांने 50,000/- रुपये पर्यंत तीन वर्षे अवधी करीता कर्जाची सुविधा उपलब्ध करुन दिले जाते .
मुद्रा कर्ज योजना : मुद्रा कर्ज सुविधा योजना अंतर्गत नविन उद्योग / व्यवसाय उभारणी करीता राष्ट्रीय कृत्त बँका कर्ज सुविधा उपलबध करुन देण्यात येते . ज्यांमध्ये लघुउद्योगांना चालना मिळावी या करीता मुद्रा कर्ज सुविधाचा केंद्र सरकारकडून दिली जाते .
-
राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ State employees get 10 days paid leave for this work every 3 years; Know the government decision of the Finance Department ] : राज्य कर्मचाऱ्यांना वर्षातुन 10 दिवस खाली नमुद करण्यात आलेल्या प्रयोजनासाठी पगारी रजा अनुज्ञेय करण्यात येते . याबाबत वित्त विभागा मार्फत निर्गमित सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे…
-
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important Gazette issued for Zilla Parishad employees on 18.07.2025 ] : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांकरीता ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 18 जुलै 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रकानुसार , नमुद करण्यात आलेले आहेत कि , महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा…
-
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Modi government’s important decision regarding leave for government employees; Information given in Parliament. ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे . या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 30 दिवसांची भरपगारी रजा मिळणार आहे . सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजे संदर्भात संसदेत प्रश्न विचाराण्यात आलेला होता…