@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आजकाल आपण पाहतो कि , सर्वांचे कल सरकारी नोकरीकडे अधिक आहे , परंतु आगामी भविष्य काळांमध्ये सरकारी नोकऱ्या ह्या कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत असल्याने , विद्यार्थ्यांना नेमके कोणत्या प्रकारचे शिक्षण घेतले पाहिजे , जेणेकरुन शिक्षण पुर्ण झाल्याच्या नंतर नोकरीची हमी मिळेल . असे कोणकोणते क्षेत्र आहेत , ते पुढीलप्रमाणे पाहुयात ..
इयत्ता 10 वी झाल्याच्या नंतर आपण सहसा 11 वी , 12 वी अभ्यासक्रम करतो , परंतु आपणांस व्यवसायभिमुख शिक्षण घ्यायचे असल्यास , आपण 10 वी नंतर आयटीआय फिल्ड कडे वळावे , कारण आयटीआय केल्यानंतर आपणांस सरकारी तसेच खाजगी क्षेत्रांमध्ये नोकरीची उत्तम संधी उपलब्ध होते . यांमध्ये शिवणकाम , ब्युटी आणि थेरपिस्ट , मेकॅनिक , कोपा अशा प्रकारचे व्यवसायभिमुख कोर्स केल्याच्या नंतर आपणांस स्वत : चा व्यवसाय करता येईल .
स्वत : चा व्यवसाय करायचा नसेल तर , खाजगी क्षेत्रांमध्ये मोठ्या पगाराची नोकरी देखिल मिळते , तर फिटर , इलेक्ट्रिशियन , मेकॅनिक , कोपा अशा प्रकारचे कोर्स केलेल्या उमेदवारांची दुबई शहरांमध्ये मोठी डिमांड आहे . ज्याठिकाणी मोठ्या पगाराची नोकरी सहज मिळते . ज्यांमध्ये आजकाल सरकारच्या अनेक प्रकल्प / उद्योग संस्थामध्ये आयटीआय / अभियंता अभ्यासक्रम पुर्ण केलेल्यांना नोकरीच्या मोठ्या संध्या उपलब्ध आहे .
आयटी क्षेत्रात सर्वाधिक स्कोप : भविष्याचा विचार केला असता , भविष्यात सर्वकाही ऑनलाईन कामकाज चालणार आहेत . जसे कि सध्यस्थितीमध्ये , ऑनलाईन शॉपिंग , ऑनलाईन खाद्यपदार्थ मागविणे , ऑनलाईन स्वरुपात मनोरंजनांचे साधने , रोबोटच्या माध्यमातुन कामे करणे . इ. गोष्टींना येत्या 10 वर्षांमध्ये सर्वाधिक स्कोप येणार आहे . कारण सध्याच्या स्थितीमध्ये दुबई सारख्या प्रगत शहरांमध्ये वस्तु / साधनांची डिलिव्हरी करण्याकरीता रोबोटचा वापर केला जातो .
यामुळे भविष्यांमध्ये आयटी ( तंत्रज्ञान ) क्षेत्राला अधिक स्कोप येणार आहे . यांमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग , सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग , बी.ई , बी.टेक , बी.सीए , एमबीए इन आयटी अशा पद्धतीच्या अभ्यासक्रमांना भविष्यांमध्ये सर्वाधिक स्कोप येणार आहे . व नोकरीच्या संधी देखिल सर्वाधिक उपलब्ध होणार आहेत .