राज्यातील “ज्या” जिल्ह्यांमध्ये मतदान पूर्ण झाली आहे , अशा जिल्ह्यात पुन्हा शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करणेबाबत प्रसिद्धीपत्रक निर्गमित ;

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : राज्यामध्ये दिनांक 19 एप्रिल 2024 पासून लोकसभा निवडणुका सुरू झाले आहेत , ज्या जिल्ह्यांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे , अशा जिल्ह्यामध्ये रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करणे संदर्भात महत्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या प्रसिद्धी पत्रकानुसार शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी गुणवत्तेच्या आधारावर पात्र ठरलेल्या उमेदवारांची निवडीकरिता शिफारस असलेली गुणवत्ता यादी व्यवस्थापन जाहिरात निहाय प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत . त्यानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्याच्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आलेली होती .

सध्या राज्यामध्ये भारत निवडणूक आयोग यांनी लोकसभा निवडणुका 2024 कार्यक्रम घोषित केला आहे , व राज्यामध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे . आचारसंहिता कालावधीमध्ये नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर पूर्णपणे निर्बंध असते , यामुळे राज्यामध्ये शिक्षक भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती .

यासंदर्भात माननीय न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्याकरिता मा. भारत निवडणूक आयोगकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता , सदर प्रस्ताव भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करणे संदर्भात परवानगी दिलेली आहे .

त्याबाबत शासन पत्र दिनांक 19 एप्रिल 2024 नुसार कार्यालयामध्ये कळविण्यात आलेले आहेत , त्यानुसार कार्यवाही करणेबाबत नियुक्ती प्राधिकारी यांना अधिकृत निर्देश देण्यात आलेली आहेत . यामुळे ज्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे ,अशा जिल्ह्यामध्ये पुन्हा शिक्षक भरती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे , त्या संदर्भामध्ये निर्गमित करण्यात आलेले सविस्तर प्रसिद्धीपत्रक पुढील प्रमाणे पाहू शकता …

Leave a Comment