शेतीला जोडधंडा असणारा शेळीपालनाचे गणित समजून घ्या : शेळीपालनाचा खर्च , शेडखर्च , चारा व मिळणारा आर्थिक फायदा !

Spread the love

@marathiprasar बालाजी पवार प्रतिनिधी : आपण जर पारंपारिक पद्धतीने शेती करत असाल तर आपण शेळीपालनांमधून कमी खर्चात सरकारी योजनेचा लाभ घेवून वर्षाकाठी चांगला नफा कमवू शकता . शेळीपालनांसाठी किती खर्च येतो , यांमध्ये शेड / चारा याबाबत एकुण खर्च वगळून किती खर्च येईल . व मिळणारे उत्पन्न किती असेल , याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

आजकाल उच्च शिक्षण घेवून देखिल चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही , सरकारी नोकरीचे प्रमाण कमी असल्याने देशांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या अधिक वाढत आहे .यामुळे सुशिक्षित बेरोजगार हे शेळीपालन / कुक्कुटपालन / वराहपालन / दुग्धव्यवसायाकडे वळले आहेत .यापैकी शेळीपालन ही मुख्यत ; मांस व दुग्ध उत्पादन मिळविण्यासाठी पालन केले जाते . आजचे एका किलो बोकड मटनांचे भाव पाहिले असता प्रतिकिला 600 ते 700/- पर्यंत असा आहे . यामुळे 15 कि.ग्रॅमचा बोकड हा सर्वसाधारणपणे 8,000/- पर्यंत विकला जातो .

आपण जर 10 शेळ्यांचा शेळीपालन व्यवसाय सुरु केला तर , प्रति शेळी ही 14 महिन्यात दोन वेळा तर 2 वर्षांमध्ये तीन वेळा पिल्ले देवू शकते . जर आपण 14 महिन्यांचा हिशोब केला असता , 14 महीन्यांत एक शेळी 2 वेळा म्हणजेच 4 पिल्ले देईल .जे पिल्ले एका वर्षांमध्ये विक्रीसाठी तयार होतात , म्हणजेच एका शेळीपासून 4 पिल्ले म्हणजे , सर्वसाधारणपणे 30,000/- एका वर्षाकाठी ( 14 महिने ) उत्पन्न मिळेल . तर 10 शेळ्यांचा हिशोब केल्यास 300,000/- रुपये उत्पन्न होईल .जर आपल्याला शेळीपालन व्यवसाय परवडत असल्यास शेळींची संख्या वाढविल्यास उत्पन्न देखिल वाढेल .

चारा नियोजन : 10 + 01  शेळींचा चारा नियोजन हे एका एकर मध्ये होवू शकते , जर शेळींना मुक्तपणे चारण्यासाठी नियोजन केल्यास तर आपणांस चाऱ्यासाठी कोणताही खर्च लागणार नाही .तसेच आपणांस सदर शेळीकरीता एखाद्या शेडची व्यवस्था करावी लागेल ..शेड बांधण्यासाठी आपणांस एकाच वेळेस खर्च येईल ,साधारणपणे आपणांस 50,000/- पर्यंत खर्च येवून जाईल पण ते कायमचे होईल .

शेळीपालन करण्यासाठी आपणांस 10 शेळी + 01 बोकड अशा पद्धतीने 3 लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाते . याकरीता पंचायत समिती / जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन कार्यालयांशी भेट द्यावी .

Leave a Comment