@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : जगांमध्ये ऑनलाईन पैसे कमाई करण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे Youtube हे आहे . Youtube च्या माध्यमातुन एक रुपयाची देखिल गुंतवणुक न करता आपण या सोशल मिडीयावर नियमित व्हिडीओ अपलोड करुन महिन्याला लाखो रुपयांची कमाई करु शकतो . भारतांमध्ये अनेक Youtuber आहेत ज्यांच्या कमाईचा मुख्य स्त्रोत हे Youtube आहे . ज्यांमध्ये डॉ.विवेक बिंद्रा , पटनाचे खान सर , द इंडियन हॅकर असे अनेक जन आहेत . ज्यांची कमाई ही लाखांमध्ये नाही तर करोडोमध्ये आहे .
व्हिडीओ कसे अपलोड करावेत ? यांमध्ये आपणांस आपल्या स्वत : च्या बनावटीचे व्हिडीओ तयार करुन Youtube वर चॅनेल तयार करुन अपलोड करावे लागते , जे कि फ्री आहे .ज्यात आपल्या चॅनेल वर 1000 Subscriber व 4000 वॉच घंटे पुर्ण झाल्याच्या नंतर आपले चॅनेल हे पैसे कमविण्यासाठी मॉनिटाईज होईल . सध्याच्या घडीला Youtube ने मागील वर्षांपासुन टीकटॉकला स्पर्धा करण्यासाठी Youtube शॉर्टस हे लाँच केले आहेत . ज्यांमध्ये आपण कॉपीराईट साँगचा / आवाज / संगितचा वापर करुन देखिल कन्टेट बनवू शकतो .ज्यांमध्ये आपणांस अधिक परिश्रम घ्यावे लागत नाहीत .
शॉर्टस् व्हिडीओ अपलोड करुन देखिल Youtube चॅनेल मॉनिटायइज होते , पण फक्त आपण Youtube शॉर्टस्च अपलोड करत असाल तर आपले चॅनेल मॉनिटायईज होण्याकरीता 1000 Subscriber व 100M Views पुर्ण होणे आवश्यक असते .
किती व्हिजला किती पैसे मिळतात : आपल्या माहितीस्तव Youtube हे व्हिडिओज वर येणारे ॲडचे पैसे Youtuber ला देत असते . आपल्या व्हिडीओला किती व्हिज आले हे महत्वाचे नसते , तर आपल्या व्हिडीओ वर किती वेळा ॲड आले त्या ॲड्स चे पैसे मिळत असतात .हे देखिल डिपेंड करते कि , आपले व्हिडीओ कोणत्या देशांमध्ये पाहिले जाते , जर अमेरिकेमध्ये आपले व्हिडीओ पाहिले जात असेल तर आपल्या एका ॲड्स 1 डॉलर पर्यंत पैसे मिळू शकतात , तर हेच भारतांमध्ये पाहिले असता , एका ॲड्सला 5 रुपये ते 80 रुपये पर्यंत कमाई होवू शकते .
म्हणजेच आपले व्हिडीओ ला 1000 व्हिज आले आहेत , व त्यावर 50 वेळा ॲड्स आले आहेत तर आपल्याला प्रति ॲड्स 5 प्रमाणे ग्रहीत धरल्यास 250/- रुपये मिळतील , परंतु हेच प्रमाण अमेरिकेसारख्या देशांमध्ये अधिक आहेत .आपण जर नियमित Youtube वर व्हिडीओ अपलोड केल्यास निश्चितच आपल्याला महिन्याला किमान 15,000/- पासुन 1 लाख रुपये पर्यंत कमाई करु शकता . चॅनेल मॉनिटाईज होईपर्यंत आपणास अधिक परिश्रम घ्यावे लागेल , त्यानंतर आपले व्हिडिओज आपोआप व्हायरल होत जातील . Youtube मन लावून परिश्रम केल्यास , निश्चित आपणांस मोठा आर्थिक फायदा होईल .