@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ birasa muda krushi kranti sudharit Yojana] : राज्य सरकारकडून शेततळे , विहिरी तसेच वीज जोडणी करिता भरीव अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे . सदर योजना यापूर्वीपासून सुरू आहे, परंतु या योजनेच्या निकषांमध्ये राज्य सरकारकडून मोठे बदल केले आहेत , यामुळे शेतकऱ्यांना आता वाढीव आर्थिक लाभ मिळणार आहे .
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे , विहिरी त्याचबरोबर वीज जोडणी अनुदान दिली जाते . यापूर्वी सदर योजने अंतर्गत नवीन विहिरी करिता 2.5 लाख रुपये पर्यंत तर , जुन्या विहिरीच्या दुरुस्ती करिता 50,000/- रुपये अनुदान दिले जात होते , यामध्ये सुधारणा करून आता नवीन विहिरी करिता 04 लाख रुपये तर जुन्या विहिरीच्या दुरुस्ती करिता 100,000/- (अक्षरी – एक लाख ) रुपये अनुदान देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे .
याशिवाय इनवेल बोअरिंग करिता 40,000/- रुपयांची तरतूद त्याचबरोबर इतर यंत्राकरिता 50,000/- हजार रुपये अनुदानाची तरतूद करण्यात आलेली आहे . याशिवाय शेततळ्यामध्ये प्लास्टिक अस्तरीकरण करण्याकरिता रुपये एक लाख अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे .
सद्यस्थितीमध्ये सदर योजना अंतर्गत तुषार सिंचन करिता 25 हजार रुपये दिले जाते , तर यामध्ये सुधारणा करून आता तुषार सिंचन खरेदी करण्याकरिता 47 हजार रुपये अनुदानाची तरतूद केली आहे तसेच परसबाग करिता अनुदान दिले जाते .
सदर योजनेअंतर्गत नवीन विहिरीचा लाभ घेतल्यास सदर लाभार्थ्यास वीस वर्षाच्या नंतर सदर विहीर दुरुस्त करण्याकरिता लाभ घेऊ शकतील . तर विज जोडणी करिता वीस हजार रुपये व विद्युत पंप संच देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे . यामुळे सदर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता अधिक फायदे होणार आहेत .
लाभ कसा घ्यावा : सदर योजनेच्या माध्यमातून ऑनलाईन महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून सदर सुधारित बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता .
- ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !
- देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !
- दि.02 , 05 , 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा /महाविद्यालये , सरकारी कार्यालयांना सुट्टी !
- राज्य कर्मचाऱ्यांना देय व अनुज्ञेय रजेची वैशिष्ट्ये – अर्जित रजा ( नियम 50 ) ; जाणून घ्या सविस्तर !
- सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगातील शेवटचे तीन महागाई भत्ता वाढ ; जाणून घ्या सविस्तर !