@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Ineligible ration card campaign started in the state; GR issued on 04.04.2025 ] : राज्यामध्ये अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविण्यात येत आहे , यासंदर्भात अन्न नागरी व पुरवठा विभागाकडून दिनांक 04 एप्रिल 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णय नुसार नमूद करण्यात आलेली आहे , की दिनांक 01 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शिधापत्रिकांची तपासणी केली जाणार आहे . यामध्ये अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी विविध निकष संदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे .
यानुसार राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकांची प्रचलित GR नुसार , तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . याशिवाय रास्त भाव अधिकृत शिधावाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सदर शासन निर्णय (GR) मध्ये जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फार्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे .
त्याचबरोबर रास्त भाव दुकानदार अधिकृत शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित रास्त भाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती भरलेले फॉर्म हमी पत्रासह स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांकासह पोच देण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे .
अर्ज (फॉर्म ) भरून देत असताना शिधापत्रिका धारकांनी ते त्या भागात राहत असल्याच्या कोणताही एक पुरावा द्यावा लागणार आहे . तसेच पुरावा म्हणून भाडे पावती , निवासस्थानकाच्या मालकीबद्दलच्या पुरावा , एलपीजी जोडणी क्रमांक बाबत पावती , बँक पासबुक , विजेचे देयक , ड्रायव्हिंग लायसन्स , मोबाईल देयके , ओळखपत्र , आधार कार्ड , मतदान ओळखपत्र इत्यादीच्या प्रती घेता येतील असे नमूद करण्यात आले आहे , तसेच सदर वास्तव्याचा पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा असे नमूद करण्यात आले आहेत .
हे पण वाचा : पदवीधारकांना मिळणार दरमहा 61,500/- विद्यावेतन ; GR निर्गमित दि.03.04.2025
शिधापत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबामध्ये एका पत्त्यावर दोन शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत , याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . त्याचबरोबर अपवादात्मक परिस्थितीत दोन वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास , तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करूनच संबंधित तहसीलदार अथवा तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी शिधा पाठक अधिकाऱ्यांनी घ्यावी असे निर्देश देण्यात आले आहेत .
त्याचबरोबर शोध मोहिमेत विशेषतः शहरी भागामध्ये विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . याशिवाय विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिकांचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . त्याचबरोबर दुबार , अस्तित्वात नसलेली व्यक्ती , मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्याचे निर्देश देण्यात आलेली आहेत .
याशिवाय शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने वितरित केली असेल त्यास शासकीय अधिकारी / कर्मचारी जबाबदार असल्यास संबंधिताविरुद्ध नियमानुसार , कार्यवाही करण्याचे निर्देश व त्याबाबतची माहिती शासनास सादर करण्याची निर्देश देण्यात आली आहेत .
या संदर्भात GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
- सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
- दिनांक 05 मे रोजीच्या काही प्रमुख घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर बातम्या !
- राज्यातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ; तब्बल 50 हजार कंत्राटी / रोजंदारी कर्मचारी होणार राज्य शासन सेवेत नियमित – कोर्टाचे निर्देश !