सोन्याची किमतीमध्ये मोठी घसरण ; प्रति तोळा ₹56000/- पर्यंत येणार !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big drop in gold prices  ] : सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे , यामुळे सोने – खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे . तज्ञांच्या मते सोन्याची किमती प्रति तोळा 56,000/- रुपये पर्यंत दर घसरण्याची शक्यता वर्तवली आहे .

यामागची कारणे देखील तज्ञांकडून देण्यात आले आहे , यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची ही उत्तम संधी गुंतवणूकदारांना असणार आहे . सोन्याची 3 एप्रिल रोजी दहा ग्रॅम सोन्याची किंमत 93 हजार रुपये इतकी होती . तर काल दिनांक 04 एप्रिल रोजी सोन्याच्या किमतीमध्ये एकाच दिवसात 1600/- रुपयांची घसरण झाली आहे , तर भविष्यात देखील सोन्याच्या किमतीत घसरण होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली आहे .

सोन्याच्या किमतीत घसरण होण्याची प्रमुख कारणे : जागतिक स्तरावर सोन्याचे उत्पादनामध्ये मोठी वाढ झाली आहे . यामुळे सोन्याचा साठा हा 9% ने वाढला आहे , याशिवाय ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचे खाणकाम सुरू आहे व जुने सोने बाजारामध्ये परत येत असल्याने , पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढत आहे .

सोन्याच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे , यामुळेच सोन्याची खरेदी कमी प्रमाणात होत आहे . यामुळेच सोन्याची किंमत देखील घसरत असल्याचा दावा तज्ञाकडून करण्यात आला आहे .तर मागील दोन दिवसांमध्ये चांदीच्या दरामध्ये देखील मोठी घसरण दिसून आली .

त्याचबरोबर सोन्याच्या किमतीमध्ये घसरण होण्याचे प्रमुख कारणांमध्ये अमेरिकेने भारतासह, 180 देशावर शुल्क लादले आहे . यामुळे जागतिक मंदीचा परिणाम म्हणून सोने- चांदीच्या किमतीत घट होताना दिसून येत आहे .

Leave a Comment