आठवा वेतन आयोगामध्ये कामाच्या आधारावर (PRP) मिळणारं पगार ; जाणून घ्या वृत्त !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Salary to be given on the basis of performance (PRP) in the Eighth Pay Commission; Know the news ] : आठवा वेतन आयोगामध्ये , केंद्र सरकारकडून मोठे बदल केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे . यामध्ये अधिकारी / कर्मचाऱ्यांना कामाच्या आधारावर पगार दिला जाणार आहे , या संदर्भातील सविस्तर वृत्त खालील प्रमाणे जाणून घेवूयात.

आठवा वेतन आयोगामध्ये (8th Pay commission) पद किंवा वरिष्ठ वेतन हे आधार न घेता कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या आधारावर पगार वाढ लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . ही संकल्पना नवीन नसून चौथ्या वेतन (4th Pay commission ) आयोगामध्ये या संदर्भात संकल्पना विचारात घेतली होती , परंतु प्रत्यक्ष अंमलात आणली गेली नाही .

PERFORMANCE RRLATED PAY : परफॉर्मन्स बेस्ड पे स्केल म्हणजेच कामाच्या आधारावर अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वार्षिक पगारात वाढ करण्याची संकल्पना आहे . ही संकल्पना आठवा वेतन आयोगामध्ये (8th Pay commission ) लागू केले जाऊ शकते . यामध्ये विशेष वेतन बोनस , वार्षिक वेतन वाढ यावर केंद्र सरकारकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे .

खाजगी संस्था प्रमाणे पॅकेजची संकल्पना : खाजगी संस्थेमध्ये अधिकारी / कर्मचाऱ्यांना वार्षिक पॅकेज ही संकल्पना पगारासाठी दिली जाते . ज्यामध्ये कामाच्या आधारावर वार्षिक बोनस दिला जातो . ही संकल्पना सरकारी / कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी लागू केली जाऊ शकते .

सहावा वेतन आयोग : सहावा वेतन आयोगामध्ये (6th Pay commission ) वार्षिक बोनस करिता परफॉर्मन्स रिलेटेड इन्स्टिव्ह स्कीम ( PRIS ) प्रस्ताव चर्चेत आला होता . परंतु सदर प्रस्तावाला मान्यता न मिळाल्याने , रखडला गेला .

हे पण वाचा : राज्य सरकारी कर्मचारी यांच्या माहे मार्च पेड इन एप्रिल वेतन देयक बाबत मोठी अपडेट ..

सातवा वेतन आयोग : याशिवाय सातवा वेतन आयोगामध्ये (7th Pay commission ) देखील कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढ देत असताना , त्यांच्या कामाच्या आधारावर वेतन वाढ दिली जावी असा प्रस्ताव दिला होता . यामध्ये कामातून मिळणारे परिणाम व गुणवत्ता या बाबी अभ्यास करूनच वेतन वाढ देण्याची शिफारस करण्यात आलेली होती .

आठवा वेतन आयोग : आठवा वेतन आयोगामध्ये , सरकारी कर्मचारी / अधिकारी यांना त्यांच्या कामाच्या आधारानुसार वार्षिक वेतन वाढ देण्याकरिता कर्मचाऱ्यांची कामगिरी परिणामकारक तसेच गुणवत्ता इ. बाबी लक्षात घेऊन वेतन वाढ दिली जाईल , या संदर्भात केंद्र सरकारकडून विशेष तरतूद केली जात असल्याची माहिती समोर येत आहे .

Leave a Comment