@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important update regarding Chief Minister’s Youth Training Scheme ] : मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना बाबत आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे . सदर योजना ही केवळ 06 महिन्यांची होती , आता सदर योजनेची मुदत संपत आल्याने , सदर योजना अंतर्गत नियुक्त उमेदवारांकडून मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे .
युवा प्रशिक्षण योजनेचा मुख्य उद्देश : युवा प्रशिक्षण योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे तरुणांना खासगी क्षेत्रात कामाचा अनुभव यावा , याकरीता युवा प्रशिक्षण योजना राबविण्यात आली . या योजनेचा कालावधी हा 06 महिने इतका ठेवण्यात आला होता , व सदर काळांमध्ये दरमहा 10 हजार रुपये मानधन देण्यात आले .
सदर तरुणांची मागणी : सदर योजना अंतर्गत नियुक्त झालेले तरुण संघटन तयार करुन सदर योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी करत आहेत , अन्यथा राज्यव्यापी आंदोलनांचा इशारा दिला गेला आहे .
राज्य मंत्रीमंडळांमध्ये सदर विषयावर चर्चा : राज्य मंत्रीमंडळ बैठकीमध्ये सदर विषयावर चर्चा करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे , यांमध्ये काही मंत्र्यांनी नकारात्मक दर्शवित सदर ही एक प्रकारची योजना असून , सदर तरुणांना मुदतवाढ देणे चुकीचे असल्याची बाब नमुद करण्यात आली .
तर काही मंत्र्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवित पुढील 06 महिने मुदवाढ देवून सदर योजना बंद करण्याचे मत व्यक्त केले आहे . याकरीता पुढील 06 महिने मुदतवाढ देणेबाबत , सरकारकडून ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे . यामुळे तब्बत 1.18 लाख तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !