राज्य कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी व मे 2025 च्या वेतन देयकाबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.05.03.2025

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ feb. and may month payment update nirnay ] : राज्य कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी व मे 2025 वेतन देयकाबाबत आत्ताची मोठी अपडेट समोर आली आहे , ती म्हणजे नियोजन विभाग मार्फत सरकारी कर्मचाऱ्यांचे सर्वंकोष माहितीकोष तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , त्याशिवाय वेतन देयके स्विकारले जाणार नाहीत , असे नमुद करण्यात आलेले आहेत .

सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , राज्य शासन सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष अद्ययावत करण्याची कार्यवाही अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून हाती घेण्यात आलेले आहे . या अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांच्या अधिनस्त दिनांकाची माहिती अद्ययावत करायची आहे .

याकरीता माहिती अद्ययावत झाल्याबाबतचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय /प्रादेशिक कार्यालय यांनी दिलेले प्रमाणपत्र माहे फेब्रुवारी 2025 च्या वेतन देयकासोबत जोडले नसल्यास अशा कार्यालयांचे वेतन देयके अधिदान व लेखा कार्यालयाने / कोषागाराने पारित न करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

काही तांत्रिक कारणास्तव सद्यस्थितीत कर्मचारी सर्वंकष माहितीकोष 2024 साठीचे संकेतस्थळ कार्यान्वित नाही , त्यामुळे ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना कर्मचारी सर्वंकष माहितीकोष 2024 मधील माहिती अद्ययावत केल्याबाबतचे दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे , शक्य झालेले नाही .

अशा कार्यालयांची माहे फेब्रुवारी 2025 ची वेतन देयके अर्थ व सांख्यिकी संचालनाच्या अधिनस्त असणाऱ्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय / प्रादेश‍िक कार्यालयाच्या प्रमाणपत्राशिवाय कोषागार / अधिदान व लेखा कार्यालयात सादर करावीत व संबंधित कोषागार अधिदान व लेखा कार्यालयांनी अशी वेतन देयके पारित करावीत असे , नमुद करण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके सादर करण्यासाठी कालमर्यादा विहीत करणेबाबत , शासन परिपत्रक निर्गमित दि.24.02.2025

त्याचबरोबर सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी पहिले व दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करुन माहे मे 2025 ( देय जुन 2025 ) च्या वेतन देयकांसोबत सादर करावेत असे नमुद करण्यात आले आहेत , तसेच माहे मे 2025 च्या वेतन देयकासोबत दुसरे प्रमाणपत्र जोडले नसल्यास अशी वेतन देयके कोषागार / अधिदान व लेखा कार्यालयांनी स्विकारु नयेत असे निर्देश देण्यात आले आहेत .

आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !

Leave a Comment