@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR issued on 28.02.2025 regarding providing assistance to affected farmers for loss of agricultural crops due to heavy rains/floods ] : माहे जुलै ते माहे ऑक्टोंबर 2024 ( मुख्यत : माहे सप्टेंबर व ऑक्टोबर ) या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी / पुर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देणेबाबत , महसुल व वन विभागांकडून दिनांक 28.02.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , माहे जुलै ते ऑक्टोंबर 2024 यांमध्ये मुख्यत : माहे सप्टेंबर व माहे ऑक्टोंबर 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी / पुर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरीता एकुण 73345.84 लक्ष रुपये इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे .
सदर निर्णयाच्या प्रपत्र तपशिलांमध्ये माहे जुलै ते माहे ऑक्टोंबर 2024 मध्ये शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरीता वितरीत करावयाच्या निधीचा लेखाशिर्षनिहाय तपशिल तसेच कोकण जिल्हा , प्रस्तावाचा दिनांक व बाधित असणारे क्षेत्र व बाधित शेतकऱ्यांची संख्या व निधी तपशिल नमुद करण्यात आलेला आहे .
राज्य शासनांच्या महसुल व वन विभाग दिनांक 01.01.2024 नुसार जिरायत पिके , बागायत पिक व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहीत दरानुसार जास्तीत जास्त 03 हेक्टर मर्यादेत असल्याची खातरजमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . तसेच कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुक्ती होणार नाही याची तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
या संदर्भातील सविस्तर निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !