@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Circular issued on 25.02.2025 regarding implementation of revised Assured Progress Scheme ] : दिनांक 01 जानेवारी 2016 पासुन अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना ( 10 , 20 व 30 वर्षे ) लागु करणेबाबत तसेच रिक्त पदाचा आढावा घेणेबाबत , उच्च व तंत्र शिक्षण विभाग मार्फत दिनांक 25.02.2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार , नमुद करण्यात आले आहेत कि , मा.मंत्री ( उच्च व तंत्र शिक्षण ) यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे मंत्रालयातील दालन क्र.303 तिसरा मजला विस्तार इमारत , मंत्रालय मुंबई येथे मंगळवार दिनांक 04.03.2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजता बैठक …
आयोजित करण्यात आली आहे . सदर बैठकीसाठी आवश्यक त्या माहितीसह उपस्थित रहाण्याची विनंती मा.श्री राजेश राठोड , विधानपरिषद सदस्य तसेच संचालक , उच्च शिक्षण पुणे व महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाचे प्रतिनिधी ( 05 ) यांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आलेली आहे .
बैठकीचे दिनांक 04.03.2025 वार मंगळवार , वेळ सायंकाळी 5.30 वाजता स्थळ – दालन क्र.303 तिसरा मजला मंत्रालय , मुंबई , तर विषय – 01.01.2016 पासुन अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागु करणे तसेच रिक्त असलेल्या पदांच्या बाबत आढावा बैठक आयोजित करणे .
तसेच सदर परिपत्रकांमध्ये बैठकीचे सविस्तर माहिती निर्देश नमुद करण्यात आलेले आहेत , ते पुढीलप्रमाणे पाहु शकता ..


आपण जर कर्मचारी निवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !
- अवेळी पाऊस यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत निधी जाहीर ; GR दि.19.03.2025
- वाहतुकीचे नियम मोडल्यास असे असतील आत्ताचे सुधारित दंड !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 19.03.2025 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
- जुनी पेन्शन , शिक्षण सेवक रद्द करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025