@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Dearness Allowance (D.A) of these state employees is 4%. ] : खाली नमुद करण्यात आलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये तब्बल 4 टक्के डी.ए वाढीची घोषणा करण्यात आलेली आहे , यामुळे होळी सणापुर्वी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळाली आहे . सदर डी.ए लाभ नेमका कोणत्या राज्यातील कर्मचाऱ्यांना मिळाली आहे , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातुन 02 वेळा डी.ए वाढ दिले जाते , तर यामुळे सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढीची वाट आतुरतेने पाहत असतात . माहे जुलै व जानेवारी या दोन महिन्यात डी.ए वाढ लागु करण्यात येत असते .
या राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीची घोषणा : पश्चिम बंगाल राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये 4 टक्यांची वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे , याबाबत पश्चिम बंगालचे वित्तमंत्री भट्टाचार्य यांनी अधिकृत घोषणा केली .
सदरचा वाढीव महागाई भत्ता हा दिनांक 01.04.2025 पासुन लागु करण्यात येणार असून , या वाढीमुळे डी.ए चे दर हे 14 टक्के वरुन 18 टक्के इतका झाला आहे . ज्याचा फायदा पश्चिम बंगाल मधील राज्य कर्मचारी व पेन्शन धारकांना होणार आहे .
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये होणार परत 3 टक्के वाढ : AICPI चे निर्देशांक लवकरच जाहीर होणार आहे , त्यानंतर केंद्र सरकारकडून माहे जानेवारी 2025 ची डी.ए वाढ जाहीर करण्यात येणार आहे . सध्याच्या माहे नोव्हेंबर पर्यंतच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डी.ए हा 55.5 टक्के पर्यंत वाढ होईल .
म्हणजेच माहे डिसेंबर महिन्यांची आकडेवारीनुसार सदर डी.ए मध्ये किमान 3 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे , यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकुण डी.ए दर हे 56 टक्के इतके होईल .
- ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !
- देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !
- दि.02 , 05 , 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा /महाविद्यालये , सरकारी कार्यालयांना सुट्टी !
- राज्य कर्मचाऱ्यांना देय व अनुज्ञेय रजेची वैशिष्ट्ये – अर्जित रजा ( नियम 50 ) ; जाणून घ्या सविस्तर !
- सरकारी कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोगातील शेवटचे तीन महागाई भत्ता वाढ ; जाणून घ्या सविस्तर !