@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Extension of tenure for majority of posts ] : राखीव पदावर नियुक्त झालेल्या परंतु जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांकरीता निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांस मुदतवाढ देणेबाबत कौशल्य रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभाग मार्फत दिनांक 14.02.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अशासकीय अनुदानित संस्थांमधील अनुसुचित जमाती प्रवर्गातुन नियुक्ती झालेले तथापि , जात प्रमाणपत्र सादर न करुन शकलेल्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहेत .
सदर अधिसंख्य पदांचा कालावधी दिनांक 06.05.2024 रोजी संपुष्टात आला आहे . सदर पदांना सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 14.12.2022 रोजीच्या तरतुदीनुसार 01 दिवसाचा तांत्रिक खंड देवून पुढील 11 महिन्यांकरीता दिनांक 08.05.2024 ते दि.07.04.2025 पर्यंत किंवा सदर अधिसंख्य पदावरील कर्मचारी सेवेत राहीले असते तर ते ज्या दिनांकाला सेवानिवृत्त झाले असते .
त्या दिनांकापर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत तरतुदींच्या अधीन राहून मुदतवाढ देण्यात येत आहे . सदर कर्मचाऱ्यांचे नावे सदर शासन निर्णयातील प्रपत्रांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
सदर कर्मचाऱ्यांच्या अधिसंख्य पदावरील मुदवाढीस सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 14.12.2022 नुसार देण्यात आलेला तांत्रिक खंड हा सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 04 ऑक्टोंबर 2024 मधील तरतुदीनुसार सर्व सेवा विषयक ( पदोन्नती व अनुकंपा धोरण वगळून ) व सेवा निवृत्ती विषयक लाभांसाठी क्षमापित करण्यात येत आहेत .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025
- आता जादा कामासाठी या शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुधारित मानधन ; GR निर्गमित दि.21.03.2025
- मार्च पेड इन एप्रिल वेतन देयक अदा करणेबाबत निधीचे वितरण ; शासन निर्णय निर्गमित दि.20.03.2025
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम अदा करणेबाबत परिपत्रक दि.11.03.2025