@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आपणांस देशातील टॉप 5 श्रीमंत शहरांचे नावे माहित आहेत का ? माहित नसल्यास आपण या लेखांमध्ये टॉप 5 श्रीमंत शहरांचे नावे व त्याबद्दल माहिती जाणुन घेणार आहोत .
मुंबई ( Mumbai ) : देशातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून मुंबईचे नाव घेतले जाते , कारण या शहरांमध्ये सर्वात जास्त कोट्याधीश लोक राहतात , तर देशातील सर्वाधित बँकांचे मुख्यालय तसेच मोठ्या विदेशी , स्वदेशी कंपन्या याच ठिकाणी कार्यरत आहेत . हे शहर सात बेटांवर वसले आहेत , गेट वे ऑफ इंडिया याच ठिकाणी आहे . तसेच बॉलीवुड चित्रपटाचे केंद्र येथेच आहेत , तसेच सर्वाधिक लोकसंख्या असणारे मुंबई हे शहर द्वितीय स्थानी आहे . या ठिकाणी कापड , धातु , अन्न प्रक्रिया तसेच ऑटोमोबाईल तसेच इलेक्ट्रानिक कंपन्यांचे केंद्र स्थान आहे . सरकारला सर्वाधिक कर याच शहरांमधून जमा होते . ह्या शहराचा कोट्यावशींच्या वास्तव्याच्या क्रमवारीत देशात पहिला क्रमांक लागतो .
दिल्ली (Dilhi ): दिल्ली हे शहर भारताची राजधानीचे शहर आहे , हे शहर देशातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे शहर आहे . या शहराचे जीडीपी दर हा 167 युएसडी अब्ज ऐवढे आहे , दिल्ली येथे मुंबई नंतर सर्वात जास्त खाजगी व सरकारी कंपन्या कार्यरत आहेत . यामुळे हे शहर सर्वात प्रदुषित शहरांच्या यादींमध्ये प्रथम स्थानी येतो . या ठिकाणी देशाची राजधानी असल्याने , देशाचे महत्वपुर्ण मुख्यालयाचे कार्यालये याच ठिकाणी आहेत . ह्या शहराचा कोट्यावशींच्या वास्तव्याच्या क्रमवारीत देशात दुसरा क्रमांक लागतो .
कोलकाता ( Kolkata ) : इंग्रजांच्या काळांमध्ये कोलकाता हे शहर देशाची राजधानीचे शहर होते , सध्या कोलकाता हे शहर देशाची सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते , अर्थव्यवस्थेच्या बाबतीत कोलकाता हे शहर महत्वपुर्ण आहे , कारण समुद्री मार्गाने सर्वात जास्त व्यापार याच शहरांतुन चालते , कोलकाता हे शहर बंदराचे शहर म्हणून आळखले जाते , या ठिकाणांहून समुदी मासेमारी व्यापार सर्वात जास्त चालते , या शहराचे जीडीपी दर 150 अब्ज युएसडी ऐवढे आहे . या ठिकणी व्हिक्टोरिया मेमोरियल , काली घाट , इंडियन म्युझियम तसेच हावडा ब्रिज असे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळे आहेत . ह्या शहराचा कोट्यावशींच्या वास्तव्याच्या क्रमवारीत देशात तिसरा क्रमांक लागतो .
बेंगळूर ( Bengalor ) : बेंगळूर हे ठिकाण कर्नाटक या राज्याचे राजधानीचे शहर असून , या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली असे संबोधले जाते , तसेच हे शहर आयटी हब म्हणून ओखळले जाते , या ठिकाणी भारताचे सर्व माहिती तंत्रज्ञानाचे मुख्यालये आहेत . या ठिकाणचे जीडीपी दर 83 अब्ज युएसडी ऐवढी आहे . ह्या शहराचा कोट्यावशींच्या वास्तव्याच्या क्रमवारीत देशात 4 वा क्रमांक लागतो .
हैद्राबाद ( Hydrabad ) : हैद्राबाद हे शहर पुर्वी निजाम राजाचे राजधानीचे शहर होते , स्वातंत्र्यानंतर निजाम राज्य भारतांमध्ये भारत सरकारने पोलिस कार्यवाही करुन देशात सामिल करुन घेतले . यामुळे या ठिकाणी पुर्वीपासुन श्रीमंतांचा आकडा जास्त आहे , यांमध्ये निजामांमध्ये वरिष्ठ पदांवर कार्य करणाऱ्यांकडे सर्वाधिक संपत्ती आहे , या ठिकाणी तेलगु चित्रपटाचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालते , या ठिकाणी पोल्ट्री उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो . या शिक्षण कमी खर्चांमध्ये होते ,यामुळे शिक्षण क्षेत्र हे उद्योगाचे प्रमुख घटक ठरले आहेत तसेच निजाम शाहींमुळे पर्यटन हा देखिल प्रमुख व्यवसाय ठरला आहे . या ठिकाणाचे जीडीपी दर 74 युएसडी ऐवढा आहे . ह्या शहराचा कोट्यावशींच्या वास्तव्याच्या क्रमवारीत देशात 5 वा क्रमांक लागतो .