@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : महिलांना आर्थिक बाबींमध्ये सक्षम बनविण्यासाठी केंद्र सरकारकडून खास गुंतवणुक योजना तयार करण्यात आलेली आहे , या योजनेच्या माध्यमातुन माहे एप्रिल 2023 ते माहे मार्च 2025 या कालावधीपर्यंत महिलांचे नावे गुंतवणुक करु शकता .या योजनावरील गुंवणुकीवर मुदत ठेवपेक्षा अधिक व्याजदर अदा करण्यात येतो , तर या योजनांमध्ये अल्प वयीन मुलींच्या नावे देखिल गुंतवणुक करु शकता .
योजनाबद्दल माहिती : ही योजना भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त माहे मार्च 2025 पर्यंत महिलांना दोन वर्षे कालावधी करीता गुंतवणुक करता येणार आहे . यांमध्ये सदर योजनाची मुदत ही दोन वर्षे कालावधी करीता कालावधी करीता आहे , परंतु यांमध्ये मुदत पुर्व काही कारणास्तव रक्कम काढण्याची सुविधा देण्यात आलेली आहे .
या योजनेचे खास वैशिष्ट्ये : या बचत योजनांमध्ये कोणतीही महिला / लहान मुलींच्या नावे देखिल गुंतवणुक करु शकतील . लहान मुलींच्या खाते पालक उघडु शकतील , ही गुंतवणुक केंद्र सरकारची असल्याने 100 टक्के सुरक्षित हाहे तर योजनांमधील गुंतवणुकीवर 7.5 टक्के वार्षिक व्याजदर अदा करण्यात येते , जे कि इतर राष्ट्रीयकृत्त बँकापेक्षा अधिक आहे .
गुंतवणुकीची किमान / कमाल रक्कम : या योजना अंतर्गत किमान 1000/- रुपये तर कमाल 2,00,000/- रुपये इतकी रक्कम गुंतवणुक करु शकता .
व्याजदर ( Rate of Intrest ) : या योजना अंतर्गत जमा करण्यात आलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक 7.5 टक्के इतके व्याजदर अदा केले जाते , तर प्रत्येक तिमाही करीता चक्रवाढ व्याज दिले जाते व सदर रक्कम खात्यांमध्ये जमा करण्यात येते .
खाते कसे उघडायचे : या योजना अंतर्गत आपणांस खाते उघडायचे असल्यास कोणत्याही राष्ट्रीय कृत बँकामध्ये तसेच भारतीय टपालाच्या कोणत्याही शाखेमध्ये खाते उघडू शकता . यासाठी आपणांस पासपोर्ट , आधार कार्ड , पासपोर्ट , ड्रायव्हिंग लायसन्स ( पर्यायी ) यांमध्ये आधार व पॅन कार्ड हे अनिवार्य असणार आहेत .
मुदत : या बचत योजनाची मुदत ही 02 वर्षांची आहे , दोन वर्षाच्या मुदतीनंतर हे खाते आपोआप बंद होते व जमा रक्कम आपणांस व्याजासह मिळते . तर मुदत पुर्व गुंतवणुक दाराचे मृत्यु झाल्यास अथवा खातेदार जीवघेण्या आजारात वैद्यकीय सहाय्य कारणास्तव मुदत पुर्व जमा रक्कम काढू शकते .