@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 5 th & 8 th Annual Examinition ] : सरकारने देशांमध्ये नविन शैक्षणिक धोरण 2020 हे देशात लागु करण्यात सुरुवात झाली आहे . तर महाराष्ट्र राज्य सरकारने देखिल या नविन शैक्षणिक धोरणांस मंजुरी दिल्याने पुढील येत्या जुन महिन्यांपासून राज्यात सर्वच शाळांमध्ये नविन शैक्षणिक धोरण लागु केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहेत .
सरकारचे सध्या सुरु असलेल्या धोरणांनुसार इयत्ता 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना नापास करता येणार नसल्याचे धोरण आहे , परंतु आता नविन शैक्षणिक धोरणांनुसार हे काही परवडणारे नसल्याने नविन शैक्षणिक धोरणांमध्ये इयत्ता पाचवी व आठवीला वार्षिक परीक्षा घेतले जाणार आहेत , ज्यांमध्ये गुणवत्तेच्या आधावर विद्यार्थ्यांना पास – नापास करता येणार आहेत . नापास न करण्याच्या धोरणांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आल्याने शालेय शिक्षण विभागांकडून नविन शैक्षणिक धोरणांमध्ये इयत्ता 5 वी व आठवीला वार्षिक परीक्षा घेण्याचे धोरण ठरविले आहेत .
नापास झाल्यास फेरपरीक्षा : जर विद्यार्थी हा इयत्ता 5 वी व आठवीच्या वर्गांमध्ये वार्षिक परीक्षेला नापास झाल्यास , सदर विद्यार्थ्याला वार्षिक परीक्षा पुन्हा द्यावी लागेल , ही परीक्षा वार्षिक निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये , सदर नापास विद्यार्थ्याची पुर्नपरीक्षा घेण्यात येईल . परंतु प्राथमिक शिक्षण पुर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेतून काढता येणार नसल्याची तरतुद करण्यात आलेली आहे .
दहावीचे बोर्ड रद्द : नविन शैक्षणिक धोरणांनुसार इयत्ता 10 वी ला असणारे बोर्ड हे रद्द होणार आहे , त्याऐवजी सेमीस्टर पॅटर्न नुसार परीक्षा घेतले जाणार आहेत , ज्यामुळे विद्यार्थ्यांना बोर्डाचे ताण कमी होईल , तर एखादा विषय अनुतीर्ण झाल्यास , त्यास पुढील सेमिस्टर मध्ये उत्तीर्ण होण्याची संधी मिळेल , यामुळे विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षेची भिती देखिल कमी होईल .