@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : आयुष्यांमध्ये आपणांस श्रीमंत व्हायचे असल्यास , आपण काही सवयी लगेच सोडल्या पाहिजेत तर काही चांगल्या सवयींचा स्विकार केला पाहीजेत , ज्यामुळे आपणांस लवकर श्रीमंत होण्यास मदत होईल . अशा कोणकोणत्या सवयी आहेत , ज्यामुळे आपणांस अधिक धनसंपन्न बनविण्यास सहाय्यभूत ठरतील अशा कोणकाणत्या सवयी आहेत , ज्यांमुळे आपली अधोगती होईल , याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..
दुसऱ्यांच्या चांगले गुण घ्यावेत : आयुष्यांमध्ये आपणांस पुढे जायचे असल्यास , नेहमी चांगल्या व्यक्तींचे चांगले गुण घ्यावेत , चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये रहावेत .दुसऱ्यांपासुन अधिकाधिक कसे शिकता येईल याचा विचार करावा . आपल्यापेक्षा मोठ्या ( संपत्ती / बुद्धतीने ) असणाऱ्यांचा हेवा न करता त्यांच्याकडून आपल्याला कसे शिकता येईल याचा विचार करावेत .
वायफट खर्च कमी करुन सतत छोटी / मोठी गुंतवणुक करावी : आयुष्यांमध्ये आपणांस लवकर श्रीमंत व्हायचे असल्यास , आपण व्यर्थ खर्च करण्यास टाळावेत , जसे कि पानसुपारी / तंबाखु खाणे / दारु पिणे अशा गोष्टींवर खर्च करण्यास शक्यतो टाळावेतच . याऊलट आपण नेहमी छोटी / मोठी गुंतवणुक करण्यास सुरुवात करावी . जसे कि , बँकेत मुदत ठेव , सरकारी येाजनेमध्ये गुंतवणुक , शेअर बाजारांमध्ये गुंतवणुक करणे . अशा प्रकारची गुंतवणुक करत राहील्यास आपणांस लवकर श्रीमंत होण्यापासून कोणीही रोकु शकत नाही .
उत्पन्न न मिळणाऱ्या बाबींवर अधिक खर्च करु नयेत / कमाईचे अनेक स्त्रोत तयार करणे : यांमध्ये आपण पैसे आल्यास लगेचच चांगले घर , गाडी , बंगला खरेदी करतो , यापेक्षा आपण घर न घेता त्यापेक्षा तोच पैसा गुंतवणुक केल्यास आपले सोर्स ऑफ इनकम ( कमाईचे साधन ) तयार होते .ज्यावेळी कमाईचे अनेक स्त्रोत होतील , जसे कि पैशांने शेती घेतली , काही पैसे मुदत ठेव म्हणून गुंतवणुक केली . अशा वेळी आपले कमाईचे साधन नक्कीच वाढणार आहेत .
व्यक्तीमत्व विकासावर पैसा खर्च करावा : आपण जगाच्या आधुनिकतेसाठी आपल्याला कायम बदलुन ठेवण्यासाठी व्यक्तीमत्व विकासावर केलेला खर्च हा एक प्रकारची गुंतवणुक असेल . जसे कि आजच्या युगांमध्ये आपणांस ऑनलाईन पद्धतीने होणारे शेअर मार्केट , गुंतवणुकीच्या अनेक पद्धती , होणारे फ्रॉड इ. गोष्टींची माहिती होणे आवश्यक आहेत , तसेच मोबाईल हे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचे घटक झाले असल्याने , मोबाईल मध्ये येणारे सर्व नविन फिचर्स शिकण्यासाठी सदैक प्रयत्न करावेत .
म्युच्युअल फंडांमध्ये करा गुंतवणुक : आपण शेअर बाजारातील चढ-उतारामुळे जोखिम घेवू शकत नसाल , तर आपण म्युच्युअल फंडामध्ये मासिक पद्धतीने गुंतवणुक करु शकता .ज्यांमध्ये आपणांस कमी जोखिमेमध्ये अधिक फायदा मिळण्यास फायदा होईल .
खर्चाचे हिशोब ठेवणे : आपण खर्चाचे हिशोब ठेवणे नेहमीच विसरुन जातो , त्यामुळे आपण किती खर्च करतो , करत असणारे खर्च हे आवश्यक आहे का ? , कोणत्या बाबींवर अधिक खर्च होतोय ? याबाबींचा सर्वंकष विचार करुन संमिक्षा करणे आवश्यक असेल . त्यावेळी आपणांस बचत वाढीकडे लक्ष देता येईल .