@marathi prasar खुशी पवार प्रतिनिधी : आपण जर विदेशांमध्ये पर्यटन करण्याचा विचार करता असाल , व कमी बजेटमुळे विदेश दौरा करु शकत नसाल तर ज्या ठिकाणी आपल्या भारतीय रुपयांचे मुल्य सर्वाधिक आहे , अशा देशांमध्ये पर्यटनास गेल्यास आपल्याला निश्चित अधिक फायदेशि असणार आहेत . असे कोण-कोणते देश आहेत , ज्यांमध्ये आपल्या भारतीय रुपयांचे मुल्य अधिक आहेत , तु पुढीप्रमाणे पाहुयात ..
01.व्हिएतनाम : व्हिएतनाम या देशांमध्ये एक रुपयाचे मुल्य 326 /- एवढे व्हिएतनामी डोंग ऐवढे आहे . या देशांमध्ये बौद्ध पॅगोडा त्याचबरोबर नद्यांकरीता सर्वात लोकप्रिय देश आहे . यांमध्ये युद्ध संग्रहालये तसेच जुन्या फ्रेंच वसाहतींचे वास्तुकला अधिक आकर्षक आहेत .यामुळे या देशांमध्ये भारतीयांना पर्यटन करण्यासाठी अधिक लाभदायक ठरणार आहेत .
02.इंडोनेशिया : भारतीय 01 रुपयाचे मुल्य इंडोनेशियांमध्ये 189/- रुपये एवढे होते . यामुळे भारतीयांना इंडोनेशियांमध्ये पर्यटन करण्यासाठी सर्वाधिक लाभदायक ठरणार आहेत . या देशांमध्ये भारतीयांना मोफत व्हिसा दिले जाते , या देशांमध्ये भारतीय पर्यटक बाली या ठिकाणी आवर्जुन भेट देतात .
03.आइसलँड : आयसलँड या देशांमध्ये भारतीय 01 रुपयांचे मुल्य 1.65/- आईसलँडिक क्रोना इतके आहे . आयसलँड या देशांमध्ये निळे सरोवर , धबेधबे , समुद्रकिनारा , तसेच हिमनदी यामुळे या ठिकाणी भारतीयांना पर्यटनांसाठी अधिक लोकप्रिय आहे . यामुळे या ठिकाणी अनेक भारतीय दरवर्षी भेट देत असतात .
04.जपान : जपान हे प्रगत राष्ट्रापैकी एक राष्ट्र आहे , परंतु या देशांचे चलन भारतीय रुपयांच्या तुलनेत कमी आहे , यामुळेच आपणांस जपानी वस्तु स्वस्त किंमतीला मिळत असतात . या देशांमध्ये भारतीय 01 रुपयांचे मुल्य 1.18 जपानी येन ऐवढे आहेत . यामुळे या ठिकाणी पर्यटनांसाठी भारतीयांना अधिक लाभदायक ठरेल . या देशांमध्ये भारतीयांना पर्यटनांसाठी मोठे उद्याने , इमारती , तीर्थक्षेत्रे मोठ्या प्रमाणात आहेत .
05.नेपाळ : नेपाळ या देशांमध्ये भारतीयांना कोणत्याही प्रकारचे व्हिसाची आवश्यक लागत नाही , याठिकाणी उंच शिखरे , माउंट एव्हरेस्ट ( जगातील सर्वात उंच शिखरे ) पर्यटनांसाठी आकर्षक आहेत . या ठिकाणी भारतीय 01 रुपयांचे मुल्य 1.60 /- नेपाळी रुपये इतके आहेत . यामुळे नेपाळ या देशांमध्ये भारतीयांना पर्यटनांसाठी अधिक लाभदायक ठरेल .
06.मंगोलिया : मंगोलिया या देशांमध्ये निर्भर निळ्या आकारचे दर्शन होते , यामुळे जे पर्यटक ग्रामीण भागांचे दर्शन करु इच्छिता त्यांच्या मंगोलिया हे देश सर्वाधिक फायदेशिर ठरेल , या देशांमध्ये भारतीय 01 रुपयांचे मुल्य 39/- मंगोलियन तुग्रिक ऐवढे आहेत .
07.श्रीलंका : श्रीलंकेमध्ये हिरवळ , ऐतिहासिक ठिकाणे , पर्वते , समुद्रकिनारे सर्वाधिक लोकप्रिय आहेत , या देशांमध्ये भारतीय 01 रुपयांचे मुल्य 2.56 ऐवढे आहेत . शिवाय श्रीलंका हे देश भारतीयांच्या जवळ असल्याने , भारतीयांना अधिक लाभदायक ठरेल .