@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Teacher strike at teacher day news ] : दिनांक 5 सप्टेंबर रोजी दरवर्षी देशात शिक्षक दिन मोठया आनंदाने साजरा करण्यात येत असतो , सदरचा दिवस शिक्षक गौरवाचा दिवस मानला जातो . परंतु याच दिवशी शिक्षकांचे शाळा बंद करून रास्ता रोको आंदोलन करण्याची वेळ आली आहे. नेमके शिक्षकांच्या कोणत्या मागण्या आहेत ते जाणून घेऊयात ..
सदरच्या आंदोलनामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या यामध्ये खाजगी प्राथमिक, महानगरपालिका, प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शिक्षक संघटनांकडून घेण्यात आला आहे . दिनांक 5 सप्टेंबर रोजी सदर शिक्षक शाळा बंद ठेवून तावडे हॉटेल येथे राष्ट्रीय महामार्गावर (नॅशनल हायवे) रास्ता रोको आंदोलन करणार आहेत .
मागील 34 दिवसापासून महाराष्ट्र विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने अनुदानाचा पुढील टप्पा मिळावा , याकरिता विविध प्रकारचे आंदोलन करण्यात येत आहे . मात्र राज्य सरकारकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय / अनुदान वाढीचे आदेश निर्गमित केलेली नाहीत . कोल्हापूर शिक्षण उपसंचालक कार्यासमोर सद्यस्थितीत श्री . खंडेराव जगदाळे व त्यांच्या सहकारी यांच्या समवेत अनुदान वाढीच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहेत , त्यांची वैद्यकीय स्थिती देखील खालावली असल्याची माहिती समोर येत आहे .
शिक्षक दिनानिमित्त शासनाकडून अनुदान वाढीचा पुढील टप्पा देणे बाबत तात्काळ आदेश निर्गमित करावे , अशा मागणी करिता सदर आंदोलन शिक्षकाकडून करण्यात येत आहे . यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था तसेच मुख्याध्यापक संघ यासह कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संघटना सदर आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे . सदर आंदोलन सकाळी 11 वाजता सुरू होणार असून जिल्ह्यातील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी सदर आंदोलनामध्ये सहभागी होण्याचे आव्हान शिक्षक संघटनाकडून करण्यात आले आहेत .
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना शिक्षकांचे नेते दादासाहेब लाड त्याचबरोबर चेअरमन राहुल पवार तसेच सचिव आर.वाय.पाटील आदी नेते उपस्थित होते .
- शेअर मार्केटमध्ये तेजी कधी येणार ? जाणून घ्या मार्केट तज्ञ , मोतीवाल ओसवाल यांचे भविष्य !
- सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
- शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट ; मार्केट आणखीन घसरण्याचा अंदाज !
- राज्यात महायुती सरकार राबवित असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण नवीन योजना ; सत्तांतर झाल्यास बंद पडण्याची भीती ..
- पुढील 48 तासात राज्यातील “या” जिह्यात , वाऱ्यासह पावसाची शक्यता !