राज्य शासकीय अधिकारी /  कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी – तातडीची बैठक  ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ maharashtra state employees various demand meeting news ]  : राज्यातील शासकीय अधिकारी , कर्मचारी यांच्या विविध मागण्याबाबत बैठक आयोजित करण्याकरिता राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ , राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना  ,महाराष्ट्र राज्य सरकारी गट चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या विविध मागण्या बाबतची निवेदन राज्य शासनास दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजीच्या संपाच्या पार्श्वभूमीवर पाठवण्यात आलेले आहेत .

त्याचबरोबर या संदर्भातील वस्तुस्थिती अवगत करण्याकरिता राज्य शासनाच्या संबंधित विभागाच्या अपर मुख्य सचिव त्याचबरोबर संबंधित संघटनेचे अध्यक्ष यांना कळविण्यात आले होते . सदर संघटना त्याचबरोबर अन्य संघटनेच्या प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत वार बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी ..

सायंकाळी 7:30 वाजता स्थळ सह्याद्री अतिगृह मलबार हिल मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे . याकरिता सदर परिपत्रकामध्ये नमूद संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिव त्याचबरोबर संबंधित संघटनेचे अध्यक्ष यांना सदर दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी च्या आयोजित बैठकीच्या वेळी उपस्थित राहण्याची विनंती सदर परिपत्रकानुसार करण्यात आलेली आहे .

यामुळे सदर बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या बाबत , सविस्तर चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली होणार असून , बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या बाबत सकारात्मक चर्चा होईल , अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment