@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 02 important GRs issued on 17.02.2025 for state employees ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत . यांमध्ये पहिल्या निर्णयात सेवा पुनर्विलोकन तर दुसऱ्या निर्णयात शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतन प्रकरणे सादर करणे असे आहेत .
01.सेवा पुनर्विलोकन : विद्युत निरीक्षणालयातील अधिक्षक अभियंता गट अ ( राजपत्रित ) या संवर्गातील अधिकाऱ्यांचे वयाच्या 50/ 55 व्या वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करणेबाबत उद्योग , उर्जा व कामगार विभागांकडून महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे . यांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1982 च्या नियम 10( 4) व नियम 65 अ नुसार ..
सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना वयाच्या 50/55 व्या वर्षी अथवा 30 वर्षे अर्हताकारी सेवा यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी त्यांचे सेवा पुनर्विलोकन करुन त्यांना शासन सेवेतुन मुदतपुर्व सेवानिवृत्त करावेत , असे शासनांचे धोरण आहे , त्यानुसार सेवा पुनर्विलोकन करुन त्यांना शासन सेवेत मुदत वाढ देण्याचे सुचना आहेत .
सदर निर्णयानुसार नमुद अधिक्षक अभियंता यांच्या वयाच्या 50/55 वर्षी अथवा 30 वर्षे अर्हताकारी सेवा यापैकी अगोदर घडेल त्यानंतर सेवेत राहण्यासाठी समितीने शिफारशीनुसार पात्र ठरविण्यात आलेले आहेत .
02.शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतन प्रकरणे : उच्च व तंत्र शिक्षक विभागाकडून दिनांक 17.02.2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून ( MahaIT ) राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतन प्रकरणे मा.महालेखापाल यांना ऑनलाईन पद्धतीने सादर करावयाच्या प्रणालीसाठी तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करुन घेणे व सुरक्षा परीरक्षणासाठीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे .
या संदर्भातील दोन्ही GR डाऊनलोड करण्यासाठी : Click Here
आपण जर कर्मचारी पेन्शन धारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामील व्हा !.
- अवेळी पाऊस यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत निधी जाहीर ; GR दि.19.03.2025
- वाहतुकीचे नियम मोडल्यास असे असतील आत्ताचे सुधारित दंड !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 19.03.2025 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
- जुनी पेन्शन , शिक्षण सेवक रद्द करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025