@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Circular regarding implementation of code of conduct for working officers/employees and all teachers ] : कार्यरत अधिकारी / कर्मचारी व सर्व शिक्षक यांचेसाठीच्या आचारसंहिता राबविणेबाबत शिक्षण विभाग ( प्राथमिक ) जिल्हा परिषद धुळे यांच्यामार्फत दिनांक 14.02.2025 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , जिल्हा परिषद शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांनी व शिक्षण विभाग अंतर्गत सुरु असलेल्या जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापक , शिक्षक यांना सदर परिपत्रकांमध्ये नमुद बाबींचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहेत .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , कर्मचाऱ्यांनी आपले ओळक्षपत्र परिधान करणे बंधनकारक असणार आहे . तसेच नियमित शालेय वेळामध्ये पोषाख स्वच्छ व निटनेटका असावा . याशिवाय शिक्षकांनी शाळेच्या वेळापुर्वीच हजर रहावेत , व काम करुन शाळा सुटल्यानंतर जावेत .
तसेच मधल्या सुट्टीचे तंतोतंत पालन करावेत . तसेच अध्ययन करत असताना , पुरविण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याचे नियमिपणे वापर करण्यात यावेत , तशा नोंदी ठेवण्याचे निर्देश आहेत . शालेय अभ्यासक्रम विहित मुदतीत पुर्ण करावेत . तसेच इयत्ता 3 री , 4 थी तसेच इ.6 वी व इ.7 वी या वर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परिक्षेची तयारी करुन घेण्यात यावी .
भौतिक सुविधांची दुरुस्ती करण्यात यावी , तसेच स्वयंपाकी व मदतनीस यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच चारित्र्य प्रमाणपत्र शालेय दप्तरी ठेवावेत . तसेच मा.मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार , 100 दिवसांच्या कृती आराखडा अंतर्गत शाळेतील वर्ग खोल्या तसेच कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवावेत .


आपण जर कर्मचारी पेन्शन धारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामील व्हा !.
- जुनी पेन्शन , शिक्षण सेवक रद्द करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम व मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप करणेबाबत महत्वपुर्ण 02 GR निर्गमित !
- महाराष्ट्र राज्य शासनामार्फत खास शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येतात ह्या महत्वपुर्ण योजना 2025
- आठवा वेतन आयोग व महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी ; जाणून घ्या काही महत्वपुर्ण बाबी !