कोरोना काळातील 18 महिने थकित महागाई भत्ता संदर्भात राज्यसभेत अ-तारांकित प्रश्न ; दि.04.02.2025

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Unstarred question in Rajya Sabha regarding 18 months of dearness allowance due during Corona period ] : सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना काळांमध्ये महागाई भत्ता गोठविण्यात आलेला होता , सदर गोठविण्यात आलेला महागाई भत्ता संदर्भात श्री.जावेद अली खान व श्री.रामजी लाल सुमन यांनी दिनांक 04.02.2025 रोजी राज्यसभेत अ-तारांकित ( 236 ) उपस्थित करण्यात आला होता .

अ-तारांकित प्रश्न : यांमध्ये कोरोना काळातील केंद्र सरकारी व निवृत्तीवेतन धारकांच्या गोठविण्यात आलेला 18 महिने महागाई भत्ता कधी अदा करण्यात येईल , किंवा सध्या देशाची आर्थिक स्थिती सुधारली तरी सरकारकडून सदर कालावधीतील डी.ए थकबाकी अदा करेल काय ? जर अदा करणे नियोजित नसल्यास त्याचा तपशिल व ठोस कारणे विचाराण्यात आलेले होते ?

सदर अ-तारांकित प्रश्नावर अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री श्री.पंकज चौधरी यांनी उत्तर दिले आहे . सदर उत्तरांमध्ये नमुद करण्यात आले आहे कि , दिनांक 01.01.2020 , 01.01.2020 व दि.01.01.2021 पासुन केंद्र सरकारी कर्मचारी / निवृत्ती वेतन धारकांना महागाई भत्ता ( डी.ए ) / महागाई भत्ता सवलत ( डी.आर ) चे तीन हप्ते गोठविण्याचा निर्णय कोरोना या साथीच्या आजारामुळे घेण्यात आला होता .

सदर प्रयोजनार्थ पैसा हा कोरोना आजाराच्या उपचार , कल्याणकारी उपायांकरीता खर्च करण्यात आला असून , सन 2020-21 या आर्थिक वर्षात आर्थिक गळती झाली , त्यामुळेच महागाई भत्ता थकबाकी देणे व्यवहार्य मानली जात नाही , असे नमुद करण्यात आले आहेत .

यामुळे सदर 18 महिने कालावधीतील महागाई भत्ता थकबाकी अदा केली जाणार नसल्याचे स्पष्ट केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सदर अ-तारांकित प्रश्नांच्या अनुषंगाने स्पष्ट केले आहेत .

Leave a Comment