HRA : सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता भत्ता मध्ये जुलै 2024 पासुन होणार वाढ ; फरकही मिळणार !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ House rent allowance for government employees will be paid from July 2024. ] : सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता मध्ये माहे जुलै 2024 पासुन वाढ होणार आहे , याबाबत सातवा वेतन आयोगांमध्ये तरतुद देखिल नमुद आहे , यानुसार सदर वाढ नियोजित आहे .

केंद्र सरकारच्या 7 वा वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार , राज्य शासन वित्त विभागाच्या वेतन आयोग मध्ये घरभाडे भत्ता वाढीची तरतुद नमुद करण्यात आलेली आहे . सातवा वेतन आयोगातील तरतुदीनुसार घरभाडे भत्ता मध्ये महागाई भत्ताच्या वाढीनुसार घरभाडे भत्ता मध्ये सुधारणा करणेबाबत , तरतुद नमुद करण्यात आलेली आहे .

सदरची तरतुद ही केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार , राज्य कर्मचाऱ्यांना लागु करण्यात येणार आहेत . या बाबत वित्त विभागांकडून दिनांक 05.02.2019 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयांमध्ये सदर HRA वाढीची तरतुद नमुद करण्यात आलेली आहे .

घरभाडे भत्ताचे सुधारित दर हे महागाई भत्ताचे दर हे 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास , लागु करणे नियोजित आहेत . सदर वित्त विभागाच्या निर्णयानुसार , नमुद आहे कि , डी.ए दर 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास , कर्मचाऱ्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार वर्गीकृत शहरांना अनुक्रमे 30 टक्के , 20 टक्के व 10 टक्के अशी घरभाडे भत्ता सुधारित करणे नियोजित आहे .

वरील निर्णयानुसार विचार केला असता , सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 01 जुलै 2024 पासुन डी.ए दर हे 53 टक्के म्हणजेच 50 टक्के पेक्षा अधिक झाले आहे . म्हणजेच घरभाडे भत्ता हा दिनांक 01.07.2024 पासुन सुधारित करण्यात येवून , फरकाची रक्कम देखिल अदा करण्यात येईल .

Leave a Comment