इ.10 वी , 12 वी परिक्षक , नियामक , वरिष्ठ परिक्षक व मुख्य नियामक यांच्या मानधनात वाढ ; परिपत्रक निर्गमित !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Increase in the remuneration of 10th, 12th examiners, controllers, senior examiners and chief controllers ] : इयत्ता 10 वी व बारावी परीक्षेकरीता परिक्षक , नियामक , वरिष्ठ परिक्षक व मुख्य नियामक यांच्या मानधनात वाढ करणेबाबत बोर्डाकडून परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे .

इयत्ता 12 वी साठी : सदरच्या परिपत्रकानुसार , परिक्षक यांना उत्तरपत्रिका तपासणे / पुनर्मूल्यांकन तसेच कालावधी वेळ नुसार मानधनात वाढ करण्यात आलेली आहे , यांमध्ये उत्तरपत्रिका तपासणे / पुनर्मुल्यांकन करणे करीता सध्या 6.00 रुपये प्रति पेपर अथवा किमान 350/- रुपये इतके मानधन आहे , तर सुधारित वाढीव मानधन नुसार 7.50/- रुपये प्रति पेपर किंवा किमान 400/- रुपये इतके मानधन वाढविण्यात आले आहेत .

तर वरिष्ठ परीक्षक – नियामक यांना उत्तरपत्रिका तपासणे / पुनर्मुल्यांकन करणे करीता सध्या प्रति पेपर 2.00/- रुपये मानधन आहे , तर आता 2.50/- प्रति पेपर किंवा किमान 450/- रुपये इतके मानधन सुधारित करण्यात आले आहेत .तर मुख्य नियामक यांना एकवट मानधन 4000/- रुपये इतके सुधारित करण्यात आले आहेत .

इयत्ता 10 वी साठी : परिक्षक यांना उत्तरपत्रिका तपासणे / पुनर्मुल्यांकन करीता सध्या 5.00/- रुपये प्रति पेपर इतके मानधन आहे , तर आता सुधारित दरानुसार 6.50/- रुपये प्रति पेपर किंवा 350/- किमान इतके मानधन सुधारित करण्यात आले आहे . तर वरिष्ठ परिक्षक यांना 1.75/- रुपये प्रति पेपर किंवा 350/- रुपये किमान मानधन आहे , तर आता 2.25/- रुपये प्रति पेपर किंवा किमान 400/- रुपये इतके मानधन सुधारित करण्यात आले आहेत .

तर मुख्य नियामक यांना एकवट मानधन म्हणून 4000/- रुपये देण्यात येणार आहेत . सुधारित मानधनामुळे परिक्षक , नियामक यांना आर्थिक फायदा होणार आहे .

Leave a Comment