राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आठवा वेतन आयोगाच्या काही महत्वपुर्ण बाबी / संभाव्य वेतनश्रेणी तक्ता ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Some important aspects of the Eighth Pay Commission regarding state employees ] : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करणेबाबत प्रक्रिया सुरु केली असून , केंद्र सरकारने आठवा वेतन लागु केल्याच्या नंतर सदर बाबींचा विचार करुन राज्य कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करण्यात येणार आहेत , यामधील काही प्रमुख बाबी कोणत्या असतील ते पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्य कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग कधी लागु होईल : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग हा दिनांक 01.01.2026 पासुन लागु होईल हे निश्चित आहे , तर त्यानंतर सदर केंद्रीय वेतन आयोगाचा अभ्यास करुन करुन राज्य कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु केला जाईल , याकरीता 01 वर्षांचा अवधी म्हणजेच दिनांक 01.01.2027 पासुन प्रत्यक्ष लागु होवू शकतो . यामध्ये दिनांक 01 जानेवारी 2026 पासुनच्या फरक देखिल दिला जाईल .

किमान वेतन : सातवा वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान मुळ वेतन हे 18,000/- रुपये तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान मुळ वेतन हे 15,000/- रुपये इतके होते . आता फिटमेंट फॅक्टर नुसार किमान मुळ वेतनातील वाढ होणार आहे . फिटमेंट फॅक्टर 2.00 पट वाढल्यास राज्य कर्मचाऱ्यांच्या किमान मुळ वेतन हे 30,000/- रुपये इतका होणार आहे .

महागाई भत्ताचा समावेश मुळ वेतनात : केंद्रीय कर्मचारी संघटनांकडुन दिलेल्या निवेदनानुसार , महागाई भत्ताचा समावेश हा मुळ वेतनातच करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे , यामुळे डी.ए वाढीची वाट पाहावी लागणार नाही , तर स्वयंचलित पद्धतीने मुळ वेतनात वाढ होत राहील .

आठवा वेतन आयोगांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचे फिटमेंट फॅक्टर 2.0 पट नुसार संभाव्य वेतनश्रेणी तक्ता :

पे-लेव्हलसातवा वेतन आयोग (मुळ वेतन)फिटमेंट फॅक्टर 2.00 पट प्रमाणे संभाव्य मुळ वेतन
लेव्हल – 0115,00030000
लेव्हल – 021530030600
लेव्हल – 031660033200
लेव्हल – 041710034200
लेव्हल – 051800036000
लेव्हल – 061990039800
लेव्हल – 072170043400
लेव्हल – 082550051000
लेव्हल – 092640052800
लेव्हल – 102920058400
लेव्हल – 113010060200
लेव्हल – 123200064000
लेव्हल – 133540070800
लेव्हल – 143860077200
लेव्हल – 154180083600

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment