@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Revised pay scale approved for 105 posts as per Bakshi Samiti Clause – 2 gr ] : राज्य वेतन सुधारणा समिती , 2017 च्या अहवाल खंड – 02 मधील वेतनश्रेणी विषयक व त्या अनुषंगिक शिफारशी स्विकृत करणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 13.02.2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
केंद्र सरकारच्या केंद्रीय सातवा वेतन आयोगामधील शिफारशींच्या आधारे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेण्यांत दि.01.01.2016 पासुन सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता . यानुसार राज्य सरकारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेण्यांमध्ये सुधारणा करण्याकरीता सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव श्री.के.पी.बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समितीचे गठण करण्यात आलेले होते .
सदर बक्षी समितीने शिफारस केल्यानुसार विविध विभागातील 105 पदांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतनस्तर मंजूर करण्यात आलेले आहेत . अशा पदांचे सुधारित वेतनश्रेणी बाबत तपशिल सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत .
राज्य सरकारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांकरीता सुधारित वेतनश्रेण्यांची शिफारस करताना केंद्र सरकार व राज्य शासनाकडे सहाव्या वेतन आयोगातील ज्या वेतन संरचना समान आहेत , त्यांच्याकरीता समितीने केंद्र सरकारकडील वेतन मॅट्रीक्स विचारात घेण्यात आलेले आहेत .
असे असले तरीही अद्याप अनेक विभागातील पदांच्या वेतनांमध्ये तफावर असल्याने , राज्य शासनांकडून वेतनत्रुटी निवारण समितीचे स्थापना करण्यात आलेली आहे . सदर समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केलेला असून , लवकरच यावर निर्णय होईल .
बक्षी समिती खंड – 02 सुधारित वेतनश्रेणी बाबत वित्त विभागाचा शासन निर्णय :
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .
- राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !