@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Circular regarding effective monitoring for quality education ] : गुणवत्तापुर्ण शिक्षण करीता प्रभावी संनियंत्रण करणेबाबत शिक्षण आयुक्तालय मार्फत दिनांक 04 फेब्रुवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
मुलांच्या शिक्षण गुणवत्तापुर्ण व आनंददायी पद्धतीने होणे आवश्यक असल्याने , शासनांच्या धोरणानुसार कृती कार्यक्रमाची जबाबदारी विविध देण्यात येत आहे . सदर परिपत्रकानुसार , कार्यवाहीचा अहवाल , अंमलबजावणी करणारे पदनाम , जबाबदाराचे विवरण / कार्यवाहीचे मुद्दे / तत्व तसेच कालमर्यादा नमुद करण्यात आले आहेत .
सदर अहवालानुसार , दर आठवड्यात गुणवत्तापुर्ण तपासणीसाठी एक शाळा भेट , 15 दिवसातुन एका शासकीय कार्यालयात भेट देणे , तसेच दर आठवड्यातुन गुणवत्तापुर्ण तपासणी साठी 02 शाळा भेटी देणे तर दर आठवड्यातुन किमान 04 शाळा गुणवत्तापुर्ण तपासणीसाठी भेटी देणे नमुद आहेत .तर शाळा भेटीसाठी अधिकाऱ्यांचे नावे नमुद करण्यात आलेले आहेत .
तसेच रोज शाळेच्या परिपाठामध्ये राज्यगीताचे ( जय जय महाराष्ट्र माझा , गर्जा महाराष्ट्र माझा ) गायन करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे . तसेच मराठी भाषा सर्व शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच विद्यार्थ्यांमध्ये उत्तम आरोग्य , व्यक्तिगत व सार्वजनिक स्वच्छतेबाबत , सजगता निर्माण करणे , तसेच कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविणे नमुद करण्यात आलेले आहेत . याशिवाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार राज्यातील शाळांची राज्यातील शाळांची संरचना 5+3+3+4 लागु करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांचे छायाचित्रांसह जिओ टॅगिंग करणे नमुद करण्यात आलेले आहेत .
या संदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025
- आता जादा कामासाठी या शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुधारित मानधन ; GR निर्गमित दि.21.03.2025
- मार्च पेड इन एप्रिल वेतन देयक अदा करणेबाबत निधीचे वितरण ; शासन निर्णय निर्गमित दि.20.03.2025
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम अदा करणेबाबत परिपत्रक दि.11.03.2025