E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ mahavitarana abhay yojana ] : राज्यातील घरगुती , औद्योगिक त्याचबरोबर व्यापारी वीज ग्राहकाकडून थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने , महावितरण कंपनीकडून सदर थकबाकीची वसुली करण्याचे कामकाज युद्धपातळीवर सुरू आहे . ज्यांची थकबाकी आहे , अशा ग्राहकांना पूर्णपणे वीज पुरवठा खंडित करून , थकबाकीची वसुली केली जात आहे .
अशा वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांकरिता अभय योजना अंतर्गत दिलासा मिळणार आहे , यामध्ये जे ग्राहक शंभर टक्के मूळ थकबाकीची भरणा करेल , त्यांना व्याजासह दंड माफ केला जाणार आहे . यामुळे ग्राहकांनी केवळ मूळ थकबाकी भरावी लागेल , व्याजाची रक्कम सदर योजने अंतर्गत सरसकट 100% माफ केले जाईल .
यामुळे ज्यांची थकबाकी मुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे , अशांनी सदर अभय योजना अंतर्गत लाभ घेऊन , मूळ थकबाकीची रक्कम भरणा करण्यात यावी . सदर थकबाकीची भरणा केल्यानंतर , महावितरण कंपनीकडून सदर ग्राहकांची वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल व व्याजाचा दंड माफ करण्यात येईल .
राज्यामध्ये सर्वाधिक थकबाकी असणाऱ्या जिल्ह्यात सांगली, सातारा , कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे . जास्त बाकी असणाऱ्या ग्राहकांची महावितरण कंपनीकडून विज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे . दिनांक 31.03.2024 पर्यंत थकबाकी व त्यावरील दंड ग्राह्य धरून , दिनांक 1.09.2024 ते दिनांक 30.11.2024 या कालावधीमध्ये सदर योजना अंतर्गत लाभ घेऊन , खंडित झालेला वीज पुरवठा परत सुरळीत करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
त्याचबरोबर सदर योजना अंतर्गत मूळ थकबाकीची 30% रक्कम भरून उर्वरित रकमा पुढील 06 हप्त्यामध्ये भरण्याची सवलत देखील देण्यात येणार आहे . यामुळे ग्राहकांना 10% अतिरिक्त सवलत मिळणार आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !