@Marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ india good relations with other countries ] : भारताचे विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी नुकतेच केलेल्या यूक्रेन दौऱ्यामुळे जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे . कारण मागील वर्षापासून रशिया व युकेन युद्ध सुरू आहे . अशा परिस्थितीत देखील भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी यूक्रेन दौरा केल्याने , भारत देशाची जागतिक पातळीवरील प्रतिष्ठा अधिकच वाढली असल्याची माहिती समोर येत आहे .
रशिया सारख्या बलाढ्य देशाचे युक्रेन सारख्या देशासोबत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये , जगातील दोन नंबर लोकसंख्या असणाऱ्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी युक्रेन दौरा केल्याने , जागतिक पातळीवर भारत देशाची प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात वाढली आहे . रशिया पूर्वीपासूनच भारताचा चांगला मित्र असून , रशिया – यूक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर इतर युरोपियन राष्ट्रांनी रशियावर कठोर निर्बंध घातले असताना देखील रशियाकडून भारताने कच्च्या तेलाची आयात करत आहे .
सदर युद्धामुळे युरोपियन देशाकडून रशियावर कठोर विरोध असताना देखील , भारताने आपल्याला स्वस्त दरामध्ये कच्चे पेट्रोलियम तेल देत असल्याने , मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहे. जे की रशियाकडून इतर राष्ट्रामार्फत बंदी घालण्यात आली आहे , यामुळेच रशियाने भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे .
म्हणजेच भारताने रशिया युक्रेन युद्धामध्ये उघडपणे कोणाचेही देखील समर्थन केले नाही . युक्रेन देशाला इतर युरोपियन राष्ट्रांचा समर्थन आहे , परंतु रशियाच्या भीतीमुळे इतर युरोपियन राष्ट्र उघडपणे युक्रेंच्या समर्थन करीत नाहीत . यामध्येच भारताने युद्धप्रसंगी तटस्थ भूमिका घेतली आहे , यामुळेच भारताची प्रतिष्ठा रशिया व युकेमध्ये प्रतिष्ठेची मानली जात आहे , भारत देश पूर्वीपासूनच युद्धाचे समर्थन करीत नाही.
सध्या जागतिक पातळीवर पाहिले असता , अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे यामध्ये इजराइल – फिलिस्तीन , पाकिस्तान ,बांगलादेश, रशिया – युक्रेन, या देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे . याचा परिणाम जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु भारतासारख्या सर्वाधिक दोन नंबर लोकसंख्या असणाऱ्या देशाला कोणत्याही परिस्थितीमध्ये , जागतिक पातळीवर कोणत्याही एका देशाचे युद्धामध्ये समर्थन करणे चुकीचे ठरणार आहे . यामुळेच भारताची विदेश नीती नेहमीच तटस्थ राहिली आहे .
- अवेळी पाऊस यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत निधी जाहीर ; GR दि.19.03.2025
- वाहतुकीचे नियम मोडल्यास असे असतील आत्ताचे सुधारित दंड !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 19.03.2025 रोजी निर्गमित झाला महत्वपुर्ण शासन निर्णय !
- जुनी पेन्शन , शिक्षण सेवक रद्द करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025