@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR issued as per court order regarding payment of salary arrears of employees with 9 percent interest ] : कर्मचाऱ्यांच्या वेतन थकबाकी 9 टक्के व्याजासह अदा करणेबाबत , मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 23.01.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार , थकबाकी याचिकाकर्ते यांना अदा करणे आवश्यक असल्याने शिक्षण संचालक , पुणे यांनी त्यांच्या दिनांक 03.10.2024 रोजी शासनांस सादर केलेल्या प्रस्तावान्वये कै.कृष्णा मोरु पाटील देशमुख विद्यालय , तुळींज नालासोपरा जि.पालघर शाळेतील 06 कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान थकबाकी अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत
वेतन थकबाकीची रक्कम 4,96,94,544/- व त्यावरील 9 टक्के व्याजाची रक्कम 44,72,508/- रुपये अशी एकुण रक्कम 5,41,67,052/- रुपये इतकी रक्कम अदा करण्यास सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे .
सदर वेतन थकबाकी अदा करण्यासाठी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद , पालघर यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत . तसेच सदर थकबाकी अदा करुन अनुपालन अहवाल शासनांस सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर निर्णयानुसार वरील नमुद शाळेतील 06 सहा.शिक्षकांना थकीत वेतन अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . याबाबतचा सविस्तर निर्णय डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE
- शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देण्याचा परिपत्रक व नमुना !
- भाजपाच्या प्रचंड विरोधानंतरही मुस्लिमांना अखेर 4% आरक्षण ; विधानसभेत मंजुरी – जाणुन घ्या सविस्तर माहिती !
- दिनांक 25 मार्च पर्यंतचा हवामान अंदाज : राज्यात या भागात पडणार अवकाळी पाऊस !
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025