राज्यातील सर्वच शाळांमध्ये पुढील वर्षांपासून CBSE पॅटर्न लागु होणार ; जाणून घ्या अपडेट !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ CBSE pattern will be implemented in all schools in the state from next year ] राज्यातील सर्वच शाळांमध्ये पुढील वर्षांपासुन सीबीएसई पॅटर्न लागु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे .

दादा भुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार , राज्यात पालकांचा ओढा हा सीबीईसी पॅटर्न कडे अधिक वळत आहे , यामुळे राज्यातील सरकारी / अनुदानित शाळांमध्ये पुढील वर्षांपासून ( शैक्षणिक वर्ष 2025-26 ) सीबीईसी पॅटर्न लागु करण्यात येणार आहेत .

सदर सीबीईसी पॅटर्न हे दोन टप्यात लागु करण्यात येणार असून , सन 2025-26 पासुन इयत्ता पहिलीसाठी तर शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये दुसऱ्या टप्यात सीबीईसी पॅटर्न राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे .

याकरीता शालेय शिक्षण मंत्री सध्या पुणे दौऱ्यावर असुन , नविन शैक्षणिक धोरणांपासून सीबीईसी पॅटर्न राबविणे बाबत , चर्चा करण्यात येत आहेत . राज्यात पालकांचा कल व केंद्रीय शैक्षणिक संधीचा विचार करुन राज्यांमध्ये नविन शैक्षणिक वर्षांपासून सीबीईसी पॅटर्न लागु केला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून देण्यात आलेली आहे .

Leave a Comment