DA News : राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 53% डी.ए वाढीचा शासन निर्णय कधी निर्गमित होणार ?

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee da vadh shasan nirnay news ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना कंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 03 टक्के डी.ए वाढ बाबत शासन निर्णय कधी निर्गमित होणार ? याकडे राज्य कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहेत .

केंद्र सरकारने दि.01 जुलै 2024 पासुन 03 डी.ए वाढ करण्यात आलेली असून , सदर महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना लागु करणे प्रलंबित आहे . राज्यात विधानसभा निवडणूका कामकाजामुळे सदर निर्णय घेण्यात आला नाही , आता राज्याचे नविन मंत्रीमंडळ स्थापन होवून महिना झाला तरीही कर्मचाऱ्यांचा प्रलंबित डी.ए वाढ लागु करण्यात येत नाही .

प्राप्त माहितीनुसार , राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीचा निर्णय जानेवारी महिन्यांच्या शेवट पर्यंत घेतला जाईल , कारण वित्त विभागांकडून याबाबत सविस्तर प्रस्ताव राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे .

हे पण वाचा : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप D ( पॉइंट्समन , ट्रॅकमन , असिस्टंट , ट्रॅकमेंटेनर ) पदांच्या 32,438 जागेवर महाभरती ;  Apply Now !

राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्याकडून याबाबत , लवकरच अधिकृत्त निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे . या महिन्यांत निर्णय निर्गमित झाल्यास , पुढील महिन्यांपासून राज्य कर्मचारी / पेन्शनधारकांना दिनांक 01 जुलै 2024 पासुन डी.ए फरकासह वाढीव 03 महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहेत .

यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकुण महागाई भत्ताचे दर हे केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 53 टक्के इतका होईल .

Leave a Comment