@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government decision regarding changes in textbooks for classes II to VIII issued on 28.01.2025 ] : इयत्ता दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करणेबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागामार्फत दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास सोपे व्हावेत , या दृष्टीने पुढील शैक्षणिक वर्षांपासुन पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .
सध्य स्थितीतील पाठ्यपुस्तकानुसार विद्यार्थ्यांना शिकविलेल्या घटकांच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचे दिसून येत नसल्याने , तसेच दप्तराचे ओझे कमी करण्याचा उद्देश सफल झाला नसून विद्यार्थी पुस्तक व वही सोबत घेवून येत असल्याने सदरचा बदल करण्यात येत असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .
यापुर्वी पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करणेबाबत शालेय शिक्षण विभागा कडून दिनांक 08 मार्च 2023 रोजी शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आलेला आहे . तर पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजेच सन 2025-26 या शैक्षणिक वर्षांपासून व त्यापुढील वर्षाकरीता पुर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानांशिवाय उपलब्ध करुन देण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे .

- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !