@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : सोन्याच्या किंमतीमध्ये आणखीण विक्रमी वाढ होणार असल्याचे संकेत येत आहेत .सध्या सोन्याच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी दिसून येत आहे , ही तेजी आंतरराष्ट्रीय बाजारभावामुळे वाढत आहे .
सध्या भारतांमध्ये लग्नसराई सुरु झाल्याने , सोन्याची वाढती मागणी व वाढती किंमत समीकरणांमुळे ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत . काल दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी सोन्याचे भाव हे प्रति 10 ग्रॅम 2400.35 डॉलर म्हणजेच 73,310/- इतक्या रुपयांची उच्चांकी गाठले आहे . मागील महिन्यातील सोन्याचे भाव पाहीले असता प्रति 10 ग्रॅम 65000/- रक्कमेवर स्थिर होता , आता सोन्याच्या भावाने नविन उच्चांकी गाठली आहे .
अमेरिकेच्या वायदा बाजारांमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये 2.3 टक्यांची लाक्षणिय वाढ दिसून आली . तर मुंबईच्या झवेरी बाजारांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दिनांक 12.04.2024 रोजी प्रति 10 ग्रॅम ( प्रति तोळा ) 73,310 रुपये इतका उच्चांकी दरात व्यवहार झाले . जर आपणांस सोन्याच्या खरेदी करायची असल्यास यांमध्ये जीएसटी व इतर कर भरावे द्यावे लागते .
म्हणजेच आपल्याला एक तोळा ( 10 ग्रॅम ) 24 कॅरेट सोने घ्यायचे असल्यास , प्रति तोळा 73,310/- रुपये + जीएसटी व इतर कर मिळून 75,500/- रुपये इतक्या किंमतीस जाते . मागील 10 दिवसांचा विचार केला असता , सोन्याच्या भावांमध्ये तब्बल 2,150/- रुपयांची लाक्षणिक वाढ झालेली आहे .
भविष्यात आणखीण सोन्याच्या किंमतीत होणार वाढ : येत्या महिनाभरांमध्ये सोन्यांच्या किंमतीमध्ये आणखीण वाढ होण्याची मोठी शक्यता अर्थतज्ञांनी व्यक्त केली आहे . कारण भारतांमध्ये लग्नसराईच्या काळात वाढती मागणी यामुळे किंमतीमध्ये वाढ होईल , असे मत व्यक्त करण्यात आलेले आहेत .